राज्यातली उद्योग बाहेर गेले त्याला शिंदे फडणवीस सरकार जबाबदार नाही तर, महाविकास आघाडी सरकार त्यासाठी जबाबदार – केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले
Views: 3460
0 0

Share with:


Read Time:1 Minute, 34 Second

पुणे : राज्यातली उद्योग बाहेर गेले त्याला शिंदे फडणवीस सरकार जबाबदार नाही तर, महाविकास आघाडी सरकार त्यासाठी जबाबदार आहे अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

तसेच गुजरात येथे झालेल्या पुल दुर्घटनेला पुलावर दंगा मस्ती करणारे तरूण कारणीभूत आहेत. त्यामुळें तो पुल कोसळला. गुजरात सरकार पेक्षा त्या दुर्घटनेला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांची  चौकशी व्हायला हवी, अशी मागणी देखिल रामदास आठवले यांनी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत 20 – 25 जागा आम्हाला हव्यायत, त्यापैकी 10 -15 जागा निवडून येतील असा दावा देखील रामदास आठवले यांनी केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आम्हाला ( भाजपाल) आवशक्यता नाही, त्यांच्या सभा मोठ्या होतात त्या आणखी मोठ्या व्हाव्यात अस देखील रामदास आठवले म्हणाले. राज्यात ओला दुष्काळ जाहीर झाला नसला तरी नुकसान भरपाई जाहीर करण्यात आलीय ती लवकर मिळावी अशी अपेक्षा देखील रामदास आठवले यांनी केली आहे.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


रिपोर्टर टुडे न्यूज

Open chat
1
Is there any news?