मन कस्तुरी रे’मधील तेजस्वी व अभिनय यांच्या प्रेमाला ‘रंग लागला’ चित्रपटातील रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला
Views: 209
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 6 Second

‘मन कस्तुरी रे’चा जबरदस्त ट्रेलर पाहून प्रेक्षकांची चित्रपट पाहाण्याची उत्सुकता वाढली असतानाच आता या चित्रपटातील ‘रंग लागला’ हे रोमँटिक साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात तेजस्वी आणि अभिनयमध्ये नव्यानं हळुवार फुलत जाणारं प्रेमाचं नातं दिसत आहे. कॉलेजमधील बहरत जाणारं प्रेम, धमाल यात दिसत आहे. शोर यांनी या गाण्याला संगीत, शब्दबद्ध केले असून आनंदी जोशी आणि अभय जोधपूरकर यांच्या सुमधुर आवाजाची जादू या गाण्यातून अनुभवता येत आहे.

हल्ली व्हायरल झालेल्या ‘नाद’ या रॅाक साँगनंतरचे हे रोमँटिक गाणे तरुण तरुणींना एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणार आहे. जिथे या प्रेमीयुगुलांना कस्तुरीचा शोध लागेल.

दिग्दर्शक संकेत माने म्हणतात, ” तेजस्वी आणि अभिनय या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. ‘मन कस्तुरी रे’ च्या सगळ्याच गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘रंग लागला’ हे गाणंही प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

गाण्याचे संगीत दिग्दर्शक शोर म्हणतात, ” या चित्रपटातील गाण्यांना तरुणांकडून कमालीचा प्रतिसाद मिळतोय. यापूर्वी प्रदर्शित झालेली गाणीही ट्रेंडिगमध्ये आहेत. ‘रंग लागला’ हे गाणे आता प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत, हे रोमॅंटिक गाणं देखील प्रेक्षकांना मोहित करेल.’’

संकेत माने दिग्दर्शित ‘मन कस्तुरी रे’ येत्या ४ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नितीन केणी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, व्यंकट अत्तिली, मृत्यूंजय किचंबरे यांच्या ईमेन्स डायमेंशन एन्टरटेनमेंट ॲण्ड आर्ट्स निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माते ड्रॅगन वॅाटर फिल्म्सचे निशीता केणी आणि करण कोंडे आहेत. वितरणाचे काम युएफओ सिने मीडिया नेटवर्क करणार असून संगीत प्रदर्शनाची धुरा टिप्सने सांभाळली आहे. ‘सैराट’सह अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारे नितीन केणी ‘मन कस्तुरी रे’चे प्रस्तुतकर्ता आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


रिपोर्टर टुडे न्यूज

Open chat
1
Is there any news?