पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाला आता ‘सामान्य प्रशासन विभाग’ म्हणून संबोधण्यात येणार
Views: 11448
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 42 Second

पिंपरी चिंचवड, दि. ३ नोव्हेंबर २०२२:–  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाच्या नावात बदल करण्यात आला असून आता प्रशासन विभागाला ‘सामान्य प्रशासन विभाग’ म्हणून संबोधण्यात येणार आहे. याबाबतचा स्वतंत्र आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी निर्गमित केला आहे. प्रशासन विभागाशी होणारा पत्रव्यवहार यापुढे ‘सामान्य प्रशासन विभाग’ या नावाने करण्यात येणार असून नागरिक तसेच पत्रव्यवहार करणाऱ्या संबंधित यंत्रणांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील विभागांकरीता विविध संवर्गातील पदे निर्माण करण्यास व महानगरपालिकेच्या आकृतीबंधास शासनाच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे. या शासननिर्णयामध्ये प्रशासन विभागाकरीता सामान्य प्रशासन विभाग असा शब्दोल्लेख करण्यात आला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम- ४५६(अ) आणि या अधिनियमातील लागू असलेल्या अन्य तरतुदीद्वारे मिळालेल्या शक्तींचा वापर करून, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंमलात असलेले सध्याचे सर्व सेवा प्रवेश नियम तसेच तत्संबंधात यापूर्वी करण्यात आलेले ठराव व आदेशांचे अधिक्रमण करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम- ४५७ (३) अंतर्गत महानगरपालिकेतील विविध पदांवर करावयाच्या नियुक्त्यांचे नियमन व सेवांचे वर्गीकरण करण्यासाठी सुधारित नियमांना दि.१८ फेब्रुवारी २०२० च्या  महाराष्ट्र शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०२०’ करीता मंजुरी देण्यात आली आहे.

या बाबी विचारात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘प्रशासन विभागा’ ऐवजी ‘सामान्य प्रशासन विभाग’ असे संबोधण्यास आणि तशी महानगरपालिका सर्व दप्तरी नोंद करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतंत्र आदेश निर्गत करून मान्यता दिली आहे. या आदेशाची अंमलबजावणी ३ नोव्हेंबर २०२२ पासून करण्यात येणार आहे. हा आदेश महापालिकेच्या सर्व विभागांना पाठविण्यात आला असून यापुढे अंतर्गत पत्रव्यवहार तथा संपर्कासाठी नव्याने निश्चित करण्यात आलेल्या ‘सामान्य प्रशासन विभाग’ या नावाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिक तसेच प्रशासकीय कामकाजासाठी पत्रव्यवहार अथवा संपर्क करणाऱ्या यंत्रणांनी झालेल्या नावबदलाची नोंद घ्यावी असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?