बृहन्मुंबई मनपाच्या चौकशीच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रकल्पातील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराची ‘कॅग’  मार्फत चौकशी व्हावी – सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर
Views: 1618
0 0

Share with:


Read Time:9 Minute, 45 Second

पुणे: मुंबई महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी `कॅग`मार्फत करण्यात येणार असल्याचे राज्याचे उपमुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (ता.३० ऑक्टोबर) जाहीर केले. त्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्याही गेल्या पाच वर्षातील भ्रष्टाचाराची अशी चौकशी करण्याची लेखी मागणी शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.

 

भापकर यांनी म्हटले आहे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे रु.रु.१२००० कोटीखमेच्या ७६ प्रकल्पातील गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत आपण विधिमंडळांमध्ये केलेल्या घोषणेप्रमाणे चौकीची शिफारस रंग (Comptroller & Auditor General) केली. या चौकशीला तातडीने मंजूर मिळुन हि चौकशी होत आहे. या निर्णयाची मी मनापासून स्वागत करतो. आपण घेतलेल्या निर्णयाबाबत आपने अभिनंदन करतो. मात्र अशाच प्रकारचे गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मागील पाच वर्षांत जाने आहेत. त्यामुळे पुढील प्रकरणांची मुंबई महापालिकेप्रमाणेच तातडीने पिंपरी चिंचवट महानगरपालिकेची देखील कॅग (Comptroller & Auditor General) मार्फत सखोल चौकशी व्हावी. १) पंतप्रधान आवास योजनेतील गैरव्यहार व भ्रष्टाचार. २) अंतरातील परोपरचा कचरा गोळा करणे म मोशी डेपोपर्यंत वाहतूक करणे यातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार ३) ३१ मार्च २०१७ नंतरचे ठेकेदारांची बिले अडवून मुख्यमंत्र्यांची फसवणूक करुन र ३०० कोटी रु. वाचवण्याचा खोटा दावा करून केलेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार ४) निगडी येथील भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपूल ग्रेड सेपरेटर अनुषंगिक कामातील गैरव्यवहार भ्रष्टाचार ५) पिंपरी चिंचवड शहरातील रस्ते विकासाच्या सव्वाचारशे कोटीच्या कामातील गैरव्यवहार में भ्रष्टाचार ) पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथील संत पिठाच्या निविदेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार ७) मंगणमत करून २. रु.५४ कोटीच्या ३६० निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार. ८) मोकाट व भटक्या कुत्र्यांवर संतती नियमन शखकिया कामात झालेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचार ) अनाधिकृत जाहिरात फलक काढणे या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार १०) खाजगी केबल नेटवर्किंगच्या (रिलायन्स) रस्ते खोदाईच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार. ११) रस्ते साफसफाई यांत्रिकी पद्धतीने रोडवरच्या कामातील गैरव्यवहार च भ्रष्टाचार १२) भोसरी, आड, थेरगाव, पिंपरी, रुग्णालय उभारणी व यंत्रसामुग्री खरेदीत झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार १३) वाय मी एम रुग्णालयातील खर्चाची यंत्रसामग्री खरेदी तसेच डॉक्टर व कर्मचारी भरती प्रकरणातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार. १४) शिक्षण मंडळातील शालेय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार १५) पाडी पालखी सोहळ्यानिमिन दिडी प्रमुखांना देण्यात आलेल्या ताडपत्री खरेदीतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार. १६) सन १९८२ ते आज पर्यंत अंतर्गत लेखापरीक्षण व विशेष लेखापरीक्षणातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार १७) शिक्षण विभागामार्फत १६ शिक्षकांना महापालिकेत वर्ग करण्यासाठी झालेला गैरव्यवहार भ्रष्टाचार. १८) पवना इंद्रायणी मुळा नदीतील जलपर्णी व कचरा काढण्याच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार १९) ऐन वेळचे विषय व वाढीव खर्च या नावाखाली झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार २०) भोसरी रुग्णालयासाठी ऑक्सिजन गॅस पाईपलाईन निविदेतील भ्रष्टाचार २१) भोसरी मोशी येथील कचरा डेपो मध्ये मुरूम पुरवण्याच्या कामातील भ्रष्टाचार.२२) रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार. २३) चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठा विभागाने विविध प्रकल्पांना पाणी एनओसी बंद प्रकरणातील भ्रष्टाचार २४) चहोली मोशी, रावेत येथील बिल्डर अधिकारी, नगरसेवकांच्या संगनमताने झालेला भ्रष्टाचार. २५) शहरातील ओला, सुखा, घातक कचरा जमा करण्यासाठी तीन कोटी रुपयांची डस्टबिन खरेदी प्रकरणातील भ्रष्टाचार. २६) स्मार्ट सिटीच्या प्रकल्प व कामाच्या सर्वच निविदेत झालेला कोट्यावधीचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार. २७) टी.डी.आर व एफ.एस.आय. वाटपात झालेले गैरव्यवहार व भ्रष्टाचार. २८) २४ बाय ७ पाणी योजनेतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार. २९) वेस्ट एनर्जी प्रकल्पातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार. ३०) जी.ई.एम व एम ए एच ए ई-टेंडर प्रणालीतील गैरव्यवहार व भ्रष्टाचार. ३१) शहरातील पाच वर्षातील सिमेंट कॉक्रिटीकरणाच्या रस्त्याच्या कामात झालेले गैरव्यवहार व भ्रष्टाचार, ३२) बोगस एफ.डी. श. आर.व बैंक गॅरंटी प्रकरणातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार. ३३ ) कै. रामकृष्ण प्रेक्षागृह नूतनीकरणाच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार. ३४) प्राधिकरण येथील के. माडगूळकर प्रेक्षागृहाच्या कामातील गैरव्यवहार व भ्रष्टाचार. ३५ ) यांत्रिकी पद्धतीने रस्ते सफाई करण्याच्या र.रू.३६२ कोटीचे कामाच्या निवेदेची चौकशी व्हावी. ३६) नवीन महापालिका भवनाची २.रु.३१२ कोटी रक्कमेच्या निवेदेची चौकशी व्हावी. ३७) स्मार्ट सिटी अमृत योजना पाणीपुरवठा आरोग्य स्थापत्य जलनिस्सारण पर्यावरण आदी विभागांच्या नेमलेल्या त्याच त्याच सल्लागारांची मुदत वाढ यामधून झालेला गैरव्यवहार व भ्रष्टाचार ३८) स्पर्श घोटाळा, डॉक्टर अनिल रॉय प्रकरण, कचरा डेपो आग प्रकरण, कुत्र्यांची नसबंदी, वैद्यकीय विभागामार्फत डॉक्टर्स कर्मचारी नर्सेस सुरक्षा रक्षक नेमण्याची ठेके त्यातील बनावट कागदपत्रे यातून झालेल्या गैरव्यवहार व भ्रष्टाचार. ३९) वेगवेगळ्या दोषी अधिकाऱ्यांवरील चौकशी अहवालांची फेर तपासणी व्हावी. ४०) दक्षता व नियंत्रण विभागामार्फत झालेल्या चौकशी चौकशी व्हावी. ४१) जलतरण तलाव नाट्यवरांचे खाजगीकरण या प्रकरणाची चौकशी व्हावी. ४२) वाढीव खर्च थेट पद्धतीची कामे याची सखोल चौकशी व्हावी.

तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वरील विषयांमध्ये मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गैरव्यवहार व भ्रष्टाचाराबाबत आपण ज्या तातडीने कॅगकडे शिफारस करून त्यास तातडीने मंजुरी घेऊन चौकशी सुरू केली आहे त्याच धर्तीवर वरील प्रकरणांची देखील कॅगच्या (Comptroller & Auditor General) माध्यमातून सखोल चौकशी व्हावी व यातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?