Mumbai Bank : आदित्य ठाकरेंचा सर्वात मोठा झटका, प्रवीण दरेकांच्या हातून मुंबै बँकेची सत्ता खेचली
Views: 283
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 20 Second

मुंबई, 13 जानेवारी :  मुंबई बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत ऐनवेळी नाट्यमय घडामोडी घडल्या आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सेनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीची घोषणा केली. अखेरीस या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदाची निवडणूक अनिर्णीत राहिली आहे. थोड्यात वेळात उपाध्यक्षपदाची निवडणुकाचा निकाल समोर येईल. या निवडणुकीत भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (praveen darekar) यांचा पराभव झाला आहे.

सिंधुदुर्ग बँक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याची परतफेड महाविकास आघाडीने मुंबई बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीत केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांच्या सूचनेनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई बँकेतील प्रतिनिधीची एकत्र बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. यावेळी युतीची घोषणा करण्यात आली.

त्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडली. यात सिद्धार्थ कांबळे यांनी बाजी मारली. मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली आहे. सिद्धार्थ कांबळे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली होती. तर उपाध्यक्षपदी अभिषेक घोसाळकर यांना उमेदवारी दिली आहे. पण, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत समसमान मत पडली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

3 thoughts on “Mumbai Bank : आदित्य ठाकरेंचा सर्वात मोठा झटका, प्रवीण दरेकांच्या हातून मुंबै बँकेची सत्ता खेचली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?