महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा; शासनाच्या या जीआरमुळे तब्बल 11 हजार 443 पदे भरली जाणार
Views: 327
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 18 Second

मुंबई: महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या या जीआरमुळे तब्बल 11 हजार 443 पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली 100 टक्के पदं भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण 11 हजार 443 पदं भरली जातील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदं वगळता अन्य पदं 50 टक्के भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.

राज्यातील पोलीस दलातील पोलीस शिपाई गट- क या संवर्गामध्ये 2021 मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई यांची 11 हजार 443 पदं रिक्त झाली होती. रिक्त झालेल ही पदं 100 टक्के भरायला परवानगी मिळाली आहे. सद्यस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याचं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. कोणतीही नवीन पद निर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदांच्या मर्यादेत रिक्त पदं भरण्यात यावीत, असंही या जीआरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

मागच्याच महिन्यामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नांदेडमधल्या कार्यक्रमात पोलीस भरती झाली पाहिजे, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमारही केला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?