पिंपरी चिंचवड मधील पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Views: 228
0 0

Share with:


Read Time:1 Minute, 19 Second

पिंपरी चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पिंपरी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. नंदकिशोर पतंगे वय- ३१ असे मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या घटनेने पिंपरी चिंचवड शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पतंगे हे पिंपरी पोलीस ठाण्याच्या मोहन नगर चौकी येथे कार्यरत होते. त्यांना दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. तिथं त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यांच्यावर उपचार सुरू झाले, हृदयाची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. पण, उपचारादरम्यान आज त्यांचा भोसरीतील खाजगी  रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं पिंपरी-चिंचवड पोलीसांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


रिपोर्टर टुडे न्यूज

Open chat
1
Is there any news?