आत्मविश्वास व ऊर्जाच्या जोरावर नव उद्योजक यशस्वी होतो ‘राइड इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह’च्या समारोप प्रसंगी लेफ्टनंट जनरल ए. अरुण यांचे विचार
Views: 166
0 0

Share with:


Read Time:5 Minute, 51 Second

पुणे: “आत्मविश्वास, कामाची ऊर्जा, शक्ती, समर्पण आणि पॅशन या गुणांच्या जोरावर कोणताही नव उद्योजक यशस्वी होऊ शकतो. संशोधन आणि नेतृत्व तुमच्या रक्ता रक्तात भिनले पाहिजे. तसेच रोज स्वतःमध्ये सुधारणा करावी,”असे विचार लेफ्टनंट जनरल ए. अरूण यांनी व्यक्त केले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या इनोव्हेशन कॉन्क्लेव्हतर्फे संशोधन, नवकल्पना, डिझाइन आणि उद्योजकता (आरआयडीई) या थीम वर आधारीत ‘राइड इनोवेेशन कॉन्क्लेव्ह २०२२’ या पाच दिवसीय कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी महेन्द्रा राइसच्या इलेक्ट्रिकल व्हेईकल विभागचे व्यवसाय प्रमुख आशुतोष दुग्गल हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
एमआयटी वर्ल्ड पीस यूनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड हे ऑनलाइन होते.
तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्र कुलगुरू डॉ. तपण पंण्डा, सेंटर फॉर इंडस्ट्री अ‍ॅकेडमिया पार्टनरशिप्सचे वरिष्ठ संचालक प्रवीण पाटील आणि डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.
एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये नव्याने उघडण्यात आलेल्या एक्सीलेटर सेंटर (सेंटर फॉर बिझनेस इनोव्हेशन अ‍ॅण्ड आंत्रप्रेन्यूअरशीप) चे उद्घाटन डॉ. विश्वनाथ दा. कराड आणि लेफ्टनंट जनरल ए. अरूण यांच्या हस्ते करण्यात आले.
लेफ्टनंट जनरल ए. अरूण म्हणाले,“नव उद्योजकांनी चेहर्‍यावर सदैव हास्य ठेवले तर तो व्यवसाय यशस्वी होण्यास वेळ लागणार नाही. कोणतेही कारणे देऊन आपल्या ध्येयापासून, लक्षापासून आणि निर्धारित केलेल्या गोल पासून दूर होऊ नका. ज्ञानाची शक्ती ही सर्वश्रेष्ठ असून विद्यार्थ्यांनी त्यावरच फोकस करावा. व्यावसायिक नेतृत्वात लिडर्सने आपल्या भावना टीममध्ये सांगाव्यात.
“प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदाची चावी ही ज्याच्या त्याच्या हातात असते. त्यामुळे २४ तास काम करण्याएैवजी आपल्या आवडी निवडी, समाजसेवा, धार्मिक कार्यालाही प्राथमिकता दयावी. या देशाचे उज्वल भविष्य युवा शक्तीच्या हातात आहे.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ विद्यार्थ्यांनी स्वःधर्म, स्वाभिमान, स्वःत्व या गोष्टींना लक्षात ठेवावे. भारतीय परंपरा ही मातृ देव, पितृ देव भव आणि आचार्य देव भव याची शिकवण देते. कोणत्याही क्षेत्रात संशोधन हे अत्यंत महत्वाचे आहे. या संशोधनातुनच जगातील सर्वात मोठ्या डोमची निर्मिती झाली आहे. त्यातून संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला जात आहे. स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार २१ व्या शतकात भारत ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येणार आहे.”
आशितोष दुग्गल म्हणाले,“ स्वामी विवेकानंदांच्या वचनावर चालणार्‍या या विद्यापीठामध्ये आता विद्यार्थ्यांनी शाश्वत संशोधन करावे. जे मानव कल्याणासाठी असेल. ”
राहुल विश्वनाथ कराड म्हणाले,“ येथे गेल्या पाच दिवासांमध्ये एका युनिक विचारांची देवाण घेवाण झाली आहे. नवनिर्मिती, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर शाश्वत विकास होतांना दिसत आहे. या देशात अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या संशोधनाच्या जोरावर सोडविल्या जाव्यात. वर्तमान काळात सर्वांनी वसाहतवादी मानसिकता स्विकारून इंडिया याला भारत असे संबोधावे. त्यामुळे देशात नवी चळवळी उभी राहण्यास वेळ लागणार नाही.”
प्रा.डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. डॉ. तपन पाण्डा यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. प्रविण पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा उद्देश आणि आढावा सांगितला.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे  यांनी आभार मानले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?