महिंद्रा लॉजिस्टिक’ च्या कर्मचाऱ्यांना १२ हजार ८०० रुपयांची पगारवाढ
Views: 2505
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 18 Second

पिंपरी चिंचवड: महिंद्रा लॉजिस्टिक लि. मधील कामगारांना तब्बल १२ हजार ८०० रुपयांची पगारवाढ मिळाली आहे. चाकण औद्योगिक पट्टयात लॉजिस्टिक उद्योग क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वाधिक पगार वाढ असून, ऐन दिवाळीत कामगारांना ‘विंटर गिफ्ट’ मिळाले आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीमधील निघोजे येथील महिंद्रा लॉजिस्टिक लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या दुसऱ्या  वेतनवाढ करारावर संघटनेचे प्रमुख सल्लागार  आमदार महेश लांडगे, रोहिदास गाडे, महिंद्रा कंपनीचे उपाध्यक्ष विजय नायर, उद्योजक संतोष शिंदे, अध्यक्ष जीवन येळवंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षरी कार्यक्रम झाला. आमदार लांडगे यांनी कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात योग्य मध्यस्थी कामगारांना न्याय दिला आहे.
यावेळी संघटनेचे सल्लागार किसन बावकर, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, चिटणीस रघुनाथ मोरे, उपाध्यक्ष शामभाऊ सुळके, खजिनदार अमृत चौधरी, संघटक तेजस बिरदवडे, दत्तात्रय गवारे, भट्टू पाटील, युनिट अध्यक्ष प्रशांत पाडेकर, व्यवस्थापनाच्या वतीने महिंद्रा कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट प्रसन्ना पहाडे, एडविन लोबो, व्हाइस प्रेसिडेंट एच.आर. हेड प्रदीप झोटिंग, जोगिंदर सिंग, सुनील धानोरकर, श्रेयस आचार्य, शेखर करंजीकर, जनरल मॅनेजर ऑपरेशन हेड मुकेश कपूर, जनरल  मॅनेजर एच.आर सतीश परब, डेप्युटी जनरल मॅनेजर एच.आर धीरज सिंह यांनी करारावर स्वाक्षरी केल्या आहेत.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदीप झोटिंग यांनी केले, व सूत्रसंचालन पुजा थिगळे यांनी केले. सरचिटणीस कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि धीरज सिंह यांनी  कार्यक्रमाचा समारोप केला. कामगारांनी डिजेच्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्यक्त केला.
*
कामगारांना मिळालेले लाभ पुढीलप्रमाणे :
कामगारांना मिळवून दिलेल्या सर्व सुविधांच्या व्यतिरिक्त
१) एकूण पगारवाढ :- १२८००/- ( बारा हजार आठशे रुपये)
२) कराराचा कालावधी ०१/०९/२०२२ ते २८/०२/२०२६ या साडेतीन वर्षांचा राहील.
३) मागील सर्व फरक कामगारांना देण्याचे मान्य केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


रिपोर्टर टुडे न्यूज

Open chat
1
Is there any news?