हँडमेड इन इंडिया या प्रकल्पांतर्गत ‘महिष्मती लूम टू मॉल’ या उपक्रमातून महिला विणकरांना मिळाला आयुष्याचा धागा
Views: 630
1 0

Share with:


Read Time:2 Minute, 40 Second

पुणे- भारतीय उद्योजकता विकास मंडळ (EDII) HSBC च्या सहकार्याने गेल्या दोन वर्षांपासून, लुप्त होत चाललेल्या हातमाग कलेचे संरक्षण करण्यासाठी आणि विणकरांना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगाराशी जोडण्यासाठी तसेच क्षमता वाढीसाठी हँडमेड इन इंडिया या प्रकल्पांतर्गत सुमारे ८००० हातमाग कारागिरांना प्रशिक्षण देत आहेत. या प्रकल्पांतर्गत, महेश्वर (मध्य प्रदेश) येथील विणकरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी भारतातील प्रोजेक्ट हँडमेडअंतर्गत तर्फे भारतातील विविध शहरांमधे ‘माहिष्मती लूम टू मॉल’ या नावाने मध्यप्रदेशातील महेश्वर समूहाच्या विणकरांनी तयार केलेल्या विविध वस्त्रांचे
प्रदर्शन आयोजित केले जात आह़े. त्यामुळे या उपक्रमातून महिला विणकरांना आयुष्याचा धागा मिळाला आहे.

पुण्यातील टिळक रस्त्यावरील टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय हातमाग प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध फॅशन शो कोरिओग्राफर चैतन्य गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन २७ मार्च पर्यंत सकाळी १२ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आह़े. या प्रसंगी विकास मंडळाचे कपिल कुमार मधुकर (विषय तज्ञ) आणि सुरेंद्र जैन (समन्वयक) उपस्थित होते. ते म्हणाले, प्रदर्शनात हातमागप्रेमींना त्यांच्या आवडीचे माहेश्वरी हातमागाचे वस्त्र थेट विणकरांकडून खरेदी करता येणार आहे. महेश्वरचे जवळपास १००० विणकर २०१९ पासून भारतातील हँडमेड प्रकल्पाशी जोडले गेले आहेत. या लाभार्थ्यांना विकास मंडळा द्वारे २५० हून अधिक विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले गेले आहे. लुप्त होत चाललेल्या हातमाग कलेला हँडमेड इन इंडिया प्रकल्पामुळे अच्छे दिन येतील यात शंका नाही!

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?