पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दितील पिंपरी गाव येथे महिला बचत गट उदघाटन समारभांचा कार्यक्रम नुकताचं पार पडला. यावेळी कोविड योद्धा युनुसभाई रशिद पठाण महाराष्ट्र राज्य सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई सेल यांच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सफाई सेल महिला पिंपरी चिंचवड शहराध्याक्षा सुवर्णा निकम तसेच सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोंढे यांच्या शुभ हस्ते आदिरा महिला बचत गट , शामवी महिला बचत गट, औदुंबर महिला बचत गट यांची दिमाखात स्थापना व उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून युनुसभाई पठाण यांनी उपस्थित सर्व महिला बचत गट व महिला रणरागिणी यांचे समोर मार्गदर्शक पर भाषण केले.
यावेळी युनूसभाई यांनी सांगितले की, महिलांनी एकञीत येऊन सक्षमीकरणाच्या माध्यमातून आपला व आपल्या कुटुंबाचा सर्वांगीन विकास साधण्या बरोबरीने विविध दिवसेंदिवस महिला मुली यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचार या विरुद्ध संघर्ष करुन सर्व बाजूने सक्षम व समृद्ध होण्याच्या दिशेने पाऊले टाकावीत. महाराष्ट्र शासन प्रशासन पुणे जिल्हा महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका या धरतीवर महिला सक्षमीकरणासाठी विविध अनेक योजना देय लाभ आहेत, याचा सर्वांनी लाभ घ्यावा विविध योजनांची माहिती स्वतःच्या बरोबरीने समाजातील प्रत्येक घर व प्रत्येक घटका पर्यंत महिलांनी पोहचवावी असे प्रतिपादन युनुसभाई पठाण यांनी केले व उपस्थित महिला वर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी सुवर्णा निकम व सामाजिक कार्यकर्ते यांनीही मार्गदर्शन केले. सुवर्णा निकम यांनी महिलांना मार्गदर्शन करताना मा श्री युनुसभाई पठाण यांचे विषयी परिचय ओळख करुन देताना युनुसभाई पठाण हे खरे कोरोना (कोविड योद्धा ) असून त्यांनी ज्यावेळी कोरोना रोगराईची प्रचंड महामारीची परिस्थिती असताना कुणीही कुणाच्या जवळ जात नसताना एक विषमतेचे भयावह गंभीर वातावरण असताना आपल्या जीवाची परवा काळजी न करता आजआखेर किमान शतकोत्तर कोविड ने मृत्यू पावलेल्या सर्व जाती धर्मांच्या पार्थिवावर ज्यांच्या त्यांच्या जाती धर्म रुढी परंपरा धार्मिक विधीवत अंत्यसंस्कार त्यांच्या त्यांच्या मर्जी परंपरेने निशुल्क करुन दिले. यावेळी स्वतःची व स्वतःच्या परिवाराची काळजी न करता त्यांनी अतिशय महत्त्वाचे काम व समाजासाठी मोठे योगदान दिले. त्यांच्या या निस्वार्थी निशुल्क प्रभावी समाजसेवे बद्दल असंख्य ठिकाणी युनुसभाई पठाण यांचा गुणगौरव व असंख्य पुरस्काराने त्यांना सन्मानाने गौरविण्यात आले. युनुसभाई पठाण यांचे कार्य समाजासाठी व समाजातील प्रत्येक शेवटच्या घटकातील व्यक्तीसाठी नेहमी प्रेरणादायी व मार्गदर्शक असे ठरेल आज आमच्या सह सर्वांनाचं युनुसभाई पठाण यांच्या कार्याचा हेवा वाटतो. समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीने कसे वागावे जगावे हा मोलाचा संदेश माणुसकीचे दर्शन आज युनुसभाईंच्या माध्यमातून दिसून येत आहे. उपस्थित महिला रणरागिणी बचत गट महिला सदस्यांनी महिलांनी युनुसभाई पठाण यांचे विषयी गुणगौरव पर विधाने भाषणे केली. तद नंतर सामाजिक कार्यकर्ते यांनीही युनुसभाई पठाण यांचे विषयी विशद करताना माणुस असावा तर असा असे म्हणून मनापासून तोंडभरुन कौतुक गुणगौरव करताना युनुसभाई पठाण यांचे विषयी अत्यंत महत्त्वाची विधाने करुन माहिती देत भाषण केले. सदर महिला बचत गट हे महिला सक्षमीकरणातून समृद्धी कडे जाण्यासाठी युनूसभाई पठाण हे मार्गदर्शन करुन कटिबद्ध कार्य करतील महिलांनी आपली खरी ताकद ओळखावी व एक होऊन संघर्ष करावा असे महत्त्वाचे विधान सामाजिक कार्यकर्ते मा श्री सुभाष लोंढे यांनी केले. सद प्रसंगी अनेक महिलांचे सत्कार सन्मान करुन महिलांना सन्मानाने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यकर्माची रुपरेषा व आभार सुवर्णा निकम यांनी मानले .