आम्ही जेलमध्ये जाऊ हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत, अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना लगावला टोला.
Views: 182
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 33 Second

नाशिक : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब  काल नाशिक जिल्ह्यावर होते. नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना अनिल परब यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही जेलमध्ये जाऊ हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत, असा टोला अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना लगावला. किरीट सोमय्या यांनी आरोप करताना नैतिकता पाळावी, असं देखील अनिल परब म्हणाले. शिवसेना  नेत्यांवर गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. सध्या किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात आरोपांची राळ उठवलीय. किरीट सोमय्या हे पुणे महापालिकेत गेले असता तिथं त्यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की झाली होती. अनिल परब हे नाशिक दौऱ्यावर असताना मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आयोजित अपघातातील जखमीवर प्रथमोचार प्रशिक्षण व प्रथमोचार किट वाटप कार्यक्रमासाठी तेमालेगावात आले असतांना माध्यमांशी बोलत होते.

 

आम्ही जेलमध्ये जाऊ हे किरीट सोमय्या यांचे ‘मंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत. किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांसदर्भात बोलताना अनिल परब यांनी मी संबधित यंत्रणेला उत्तरे देईल, असं म्हटलं. आरोप करताना नौतिकता पाळावी, अशा शब्दात परिवहनमंत्री अनिल परब पोलीस बदली प्रकरणी किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाचा समाचार घेतला.

 

पुण्याच्या महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी शिवसैनिक किरीट सोमय्या यांना भेटण्यासाठी गेले होते. आयुक्तांना जाब विचारायला हवा होता. मात्र, ते पळत सुटले खाली पडले त्यांना कोणीही मारले नाही.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “आम्ही जेलमध्ये जाऊ हे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ आहेत, अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांना लगावला टोला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?