केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतले जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन
Views: 233
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 21 Second

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले. अर्थमंत्री सीतारामन काल पासून बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असून आज त्यांचे जेजुरी गडावर आगमन झाले.

त्यांच्या सोबत माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील, दौडचे आ राहुल कुल, कांचन कुल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, संगीताराजे जाधवराव निंबाळकर, सचिन पेशवे, आ.माधुरी मिसाळ, आ. बाळा भेगडे त्याचबरोबर स्थानिक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

खडाबाच दर्शन घेऊन त्यांनी कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी ही उरकले. गडकोटातील बालदारीत झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांचे मार्तंड देवसंस्थान, पुजारी वर्गाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. पुजारी वर्गाकडून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

खंडेरायाच्या दर्शनानंतर त्या आज बारामतीला जाणार आहेत. भाजपाने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पुण्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधला तसेच  बूथ अध्यक्षांची बैठक देखील घेतली. भाजपाच्या मिशन बारामतीवरून काही दिवसांपूर्वी चांगलेच आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पहायला मिळालं. आता सीतारमन यांच्या बारामती दौऱ्याला सुरुवात झाली आहे.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Open chat
1
Is there any news?