आत्ताचे मानवी जीवन हे अत्यंत धकाधकीचे बनलेले आहे. येथे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. जगण्यासाठी धडपड सुरू आहे. या प्रत्येक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वेळ अपुरा वाटतं आहे. त्यामुळे जीवन जगत असताना आजच्या पिढीला नातेसंबंध जपण्यासाठी फारसा वेळ उपलब्ध नाही.
त्याचप्रमाणें वेळ नसेल तरी सुरूवातीला सर्वजण आपापले नातेसंबंध जपण्यासाठी धडपड करीत असतो. जे नाते संबंध टिकविण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या आजुबाजूला अनेक हितचिंतक म्हणविणारे सगेसोयरे, नातेवाईक, सखेसंंबंधी, मित्रपरिवार, शेजारी इत्यादी अनेक प्रकारचे स्वतः ला इतर कुटुंबाचे स्वयंघोषित हितचिंतक म्हणविणारे कोणी ना कोणी असतातच.
अश्या स्वयंघोषित हितचिंतक म्हणविणा-यांना बहुतांश वेळा प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारची वास्तव माहिती नसतेच.
*१) त्यांच्याकडे आपल्यापर्यंत आपल्यासाठी जी माहिती पोहोचविण्याची असते ती सर्व माहिती खरी आहे, याची खात्री नसते ?*
*२) आपल्याबद्दलचे चांगले विचार आहेत याचीही खात्री नसते ?*
*३) ती माहिती मला उपयोगी असणार आहे याचीही खात्री नसते ?*
परंतु मानवी स्वभावानुसार आपण जी व्यक्ती आपल्याला काय सांगत आहे त्याबद्दल तीलादेखील वरील तीनही मुद्यांवर खात्री नाही. अश्या विघ्नसंतोषी हितचिंतकांनी सांगितलेल्या कल्पोकल्पीत सूचना ऐकून हितसंबंध बिघडवून घेत असतो.
प्रत्येकाने आज हे जाणून घेणे आवश्यक आहे की आपण ह्या नश्वर जीवनात किती दिवस असणार आहोत. आज आहे तोपर्यंत आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आपापल्या परीने काळजी घेणे गरजेचे आहे. कुटुंबातील प्रत्येक जण आपापल्या घरी महत्वाचा घटक आहे. एकमेकांना समजून घेऊन एकमेकांना जपण्यासाठी प्रत्येकाने झटले पाहिजे.
जर कोणी हितचिंतकांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी *ट्रिपल (तिहेरी) फिल्टर वापरावा* हिच आजच्या काळाची प्रमुख गरज आहे.
माझे मत योग्य आहे की नाही हे पुढे जाऊन येणारा काळच ठरवेल. त्यासाठी समजावून घेण्यासाठी योगसद्गुरूंच्या दिलेल्या सूचना विचारात घेणे आवश्यक आहे.
*एके दिवशी एक व्यक्ती (योगसद्गुरूंच्या) माझे केंद्रात आली. मला भेटली आणि म्हणाली, ‘मी तुमचे शेजारी, नातेवाईक किंवा मित्राबद्दल जे काय ऐकले ते तुम्हाला मी सांगूं का*?
*एक मिनिट थांबा’ मी उत्तर दिले. ‘काही सांगण्यापूर्वी मी थोडीशी तुमची परीक्षा घेतो, परीक्षेत उत्तीर्ण झालात तरच सांगा, आपण याला ‘ ट्रिपल (तिहेरी) फिल्टर चाचणी असे म्हणू…… चालेल*?
*ती व्यक्ती म्हणाली, ‘ट्रिपल (तिहेरी) फिल्टर ? ‘ठीक आहे*.
*मी पुढे म्हणालो ‘माझ्या शेजारी, नातेवाईक किंवा मित्राबद्दल माझ्याशी बोलण्यापूर्वी, तुम्ही जे काय म्हणणार आहात, ते फिल्टर करणे चांगले आहे, गरजेचे आहे. म्हणूनच मी त्याला ट्रिपल (तिहेरी) फिल्टर चाचणी म्हणतो :-*
*१) आता पहिला फिल्टर, तुम्ही जे सांगणार आहात, ते सत्य आहे का*? ‘
*थोडेसे थांबून ती व्यक्ती म्हणाली ‘नाही,’ ‘खरंच मी त्याबद्दल ऐकले आणि …….’*
*ठीक आहे,’ मी त्यांना म्हणालो तुम्ही जे मला सांगणार आहात ते खरं आहे, याचीही खात्री नाही तुम्हाला ?*
*२) आता दुसरा फिल्टर, आता चांगुलपणाचे फिल्टर वापरून पाहू या. आपण माझ्या मित्राबद्दल काहीतरी सांगणार आहात ते त्याच्या बद्दलचे चांगले विचार आहेत काय*?’
*ती व्यक्ती म्हणाली ‘नाही*, *उलट …………’ ‘मग, मध्येच तोडत मी पुढे म्हणालो, तू मला त्याच्याबद्दल काहीतरी वाईट सांगू इच्छित आहेस आणि ते खरे आहे की नाही याची शाश्वती नाही, ठीक आहे.*
*३) आता उपयुक्तता फिल्टर हा शेवटचा फिल्टर….. जे तू माझ्या शेजारी, नातेवाईक किंवा मित्राचे बाबतीत सांगणार आहेस ती माहिती मला उपयोगी असणार आहे काय ?*
*नाही, तशी तुम्हाला ती उपयुक्त खरंच नाही’ ती व्यक्ती ओशाळत म्हणाली.*
*ठीक आहे, म्हणजे ‘जर तुम्ही मला सांगू इच्छिता, ते ना सत्य आहे, ना चांगले आहे , ना मला उपयोगी देखील आहे, तर मला ते का सांगता आहात ?*
*प्रत्येक वेळी आपल्या जवळच्या प्रिय जनाबद्दल, मित्रा बद्दल ऐकताना या ट्रिपल (तिहेरी) फिल्टरचा वापर करावा आणि आपल्या मैत्रीवर भरंवसा ठेवावा.*
*हे ट्रिपल (तिहेरी) फिल्टरचे शास्त्र खरोखर खूप उपयुक्त आहे*
*आपापसातील गैरसमज दूर ठेवायचे असतील तर प्रत्येक व्यक्तीने हे ट्रिपल (तिहेरी) फिल्टर आचरणात आणावी, असं माझं स्पष्ट मत आहे.*
*हीच आहे योगसद्गुरु यांनी सांगितलेली आजच्या घडीला नातेसंबंध दृढ करण्यासाठी आवश्यक विश्वासपात्र, आचरणात आणण्यासाठी सुयोग्य अशीच जीवन पद्धती – कुटुंबनीती म्हणजेच ट्रिपल (तिहेरी) फिल्टर, काळाची गरज*
*✒️डॉ. कृष्णदेव गिरी (योगसद्गुरू)*
*१. सदस्य, मराठी विश्वकोश (महाराष्ट्र शासन)*
*२. राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा.*
*३. राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदू रक्षा समिती, भारत.*
*सौजन्याने : – हिंदू धर्मगुरु दशनाम गोस्वामी आखाडा*
➖➖🙏🏻🌹🌹🙏🏻➖