आदिवासी सांस्कृतिक उत्सव पुणे व पिंपरी चिंचवड शहर आयोजित भव्य जागतिक आदिवासी दिन साजरा
Views: 1275
2 0

Share with:


Read Time:3 Minute, 43 Second

पुणे : जागतिक आदिवासी दिवसानिमित्त आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती पुणे व पिंपरी चिंचवड शहर आयोजित भव्य जागतिक आदिवासी दिन भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

उद्घाटक अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शोभायात्रा उद्घाटक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपायुक्त आशादेवी दुर्गुडे अध्यक्ष नामदेव गंभीरे, उपायुक्त नगरपालिका प्रशासन दत्तात्रय लांगी, माजी महापौर शकुंतला दराडे, माजी नगरसेवक मारुती सांगळे, भाऊसाहेब सुपे, आशा सुपे, उषा मुंडे, रोहिणी चिमटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांस्कृतीक शोभायात्रा काढण्यात आली. त्याचबरोबर बिरसा ब्रिगेडचे जयसिंग डूडवे, आदिवासी संस्कृती प्रचारक राहुल कन्नाके तर प्राध्यापक डॉक्टर तुकाराम रोमटे या प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शन, विद्यार्थी प्रतिनिधींचे मनोगत, विद्यार्थ्यांचा सत्कार कृती कार्यक्रम, महिला लेझीम पथकांचा सत्कार अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती. एकलव्य, राणी दुर्गावती, राघोजी भांगरे, बाबुराव शेडमाके, तंट्या मामा, बिरसा मुंडा, जयपाल सिंग मुंडा, डॉक्टर गोविंद गारे या क्रांतिकारकांचे प्रतिमा, आदिवासी महिलांनी बनवलेले खाद्य पदार्थ, आणि क्रांतिकारकांच्या शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्ती हे खास आकर्षण होते. या कार्यक्रमाला आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बिरसा ब्रिगेडचे जयसिंग डूडवे यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले की, युपीए आणि एनडीए हे दोन्ही सरकार ने आदिवासींच्या बांधवांसोबत सामाजिक गद्दारी केली आहे. आपले नेते समाजाचे नेतृत्व न करता करता पक्षाचे नेतृत्व करतात, ही शोकांतिका आहे. आपण सर्वांनी मिळून ‘एक पाऊल गावाकडे’ ही वैचारिक बैठक आयोजित करून गावागावांत जाऊन समाज कार्यात सहभागी झाले पाहिजे. त्याचबरोबर बिरसा मुंडा होऊन राष्ट्रीय पातळीवर एकजूट व्हायला हवे. काही तथाकथित लोक स्वतःला आम्ही आदिवासी असे सांगतात, 2 ते 3 हजार रुपये देऊन धर्म बदलण्याचे आमिष दाखवले जाते.

तर राहुल कन्नाके यांनी भगवान या शब्दामागे तेवढीच अंधश्रद्धा आहे. इथला आदिवासी बांधव निसर्गाला पूजतो, तो दैवताला आणि चमत्काराला मानत नाही. आज आपण डोळे झाकले तर उद्याची पिढी मंदिर बनवून टाकतील. त्यामुळे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांचा इतिहास गहाण होईल, असे विचार आपले विचार मांडले.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “आदिवासी सांस्कृतिक उत्सव पुणे व पिंपरी चिंचवड शहर आयोजित भव्य जागतिक आदिवासी दिन साजरा

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?