
पिंपरी चिंचवड: त्रिवेणीनगर-कृष्णानगर चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी स्पाइन रस्त्याचे काम चालू करण्या संदर्भात तसेच त्या ठिकाणी आवश्यक उड्डाणपूल किंवा ग्रेडसेपरेटर तातडीने करणेबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी मनसे शहर अध्यक्ष/ नगरसेवक सचिन भाऊ चिखले, उपशहरअध्यक्ष विशाल मानकरी, मनसे वाहतूक सेना शहर अध्यक्ष सुशांत साळवी, उपशहरअध्यक्ष नितीन सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास शिवणेकर उपस्थीत होते.
स्पाइन रस्त्याचे काम करण्यासाठी त्या रस्त्यात ज्या नागरिकांची घरे बाधित झाली अश्या सर्व नागरिकांच्या घरांचे लवकरात लवकर पुनर्वसन करुण त्या बदल्यात त्यांना ज्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे ती लवकरात लवकर त्यांना हस्तांतरीत करावी या संदर्भात आयुक्त साहेबांशी चर्चा करण्यात आली लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेऊ, असे आयुक्तांनी सांगितले.