चित्रपटनिर्मिती क्षेत्रावर सरकारी नियंत्रण असू शकत नाही – प्रल्हाद कक्कड यांचे प्रतिपादन
Views: 207
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 43 Second

पुणे : समाज म्हणून आपण जसे बदलत आहोत, त्याचेच प्रतिबिंब आपल्या चित्रपटांतून उमटते आहे. जग खुले झाले आहे. चित्रपटसृष्टीही या खुलेपणाचा स्वीकार करत आहे. अशा परिस्थितीत चित्रपट निर्मितीक्षेत्रावर सरकारी नियंत्रण असू शकत नाही. चित्रपटाचा बरेवाईटपणा ठरविण्याचा अधिकार प्रेक्षकांचा आहे, असे ठाम प्रतिपादन फिल्ममेकर आणि जाहिरातगुरू प्रल्हाद कक्कड यांनी शुक्रवारी येथे केले. भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पिस यूनिव्हर्सिची आयोजित बाराव्या भारतीय छात्र संसदेच्या चौथ्या सत्रात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ओडिसाचे खासदार तसेच अभिनेते अनुभव मोहंती, बिहार विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष मोहंमद हरून रशीद तसेच चित्रपट व मालिका लेखक, दिग्दर्शक रवी राय या मान्यवरांनी या चर्चेत भाग घेतला.कक्कड म्हणाले,‘विद्यार्थ्यांनी मोकळेपणाने आपले अनुभव, विचार गोष्टीरूपाने मांडले पाहिजेत. नव्याचा स्वीकार जरूर करा, पण आपल्या समृद्ध परंपरेची, संचिताची जाणीव ठेवा. राजकीय पुढारी जेव्हा आपल्या संस्कृतीचे गोडवे सांगू लागतील, तेव्हा सावध रहा. ते कदाचित तुमच्या मनाला नियंत्रित करू पाहतील.रशीद म्हणाले,‘भारतीय चित्रपटसृष्टीने मोठा पल्ला गाठला आहे. मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती या उद्योगाने केली आहे. विदेशी गोष्टी चित्रपटांनी स्वीकारल्या म्हणून लगेच आपल्या परंपरेशी, संस्कृतीशी प्रतारणा केली, असा अर्थ होत नाही. जगभरातील अनेक ठिकाणांहून चांगल्या गोष्टी स्वीकारणे, चित्रपटांना समृद्ध करणारे ठरले आहे,’.राय म्हणाले,‘गेल्या दोन वर्षांपासून चित्रपट उद्योग मोठ्या संकटातून जात आहे.  चित्रपट, संगीत, चित्रकला या विश्वव्यापी कला आहेत, चित्रपट हे समाजाचे प्रतिबिंब असते. नव्याने आलेल्या ओटीटी व्यासपीठाने तर चित्रपट विश्वव्यापक केले आहेत. या स्थित्यंतरांचा आपण खुल्या मनाने स्वीकार केला पाहिजे,’.—-चौकट आदर्श युवा विधायक आणि उच्चशिक्षित सरपंच सन्मान राजस्थान विधानसभेच्या आमदार दिव्या महिपाल माद्रेना, मध्यप्रदेशचे आमदार प्रवीण पाठक यांना आदर्श युवा विधेयक सन्मान तर शेषंदीप कौर सिंधू, अखिला यादव आणि पल्लवी ठाकूर यांना एमआयटी वर्ल्ड पिस यूनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डा. राहुल कराडे यांच्या हस्ते उच्च शिक्षित आदर्श सरपंच सन्मान प्रदान करून गौरवण्यात आले.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


रिपोर्टर टुडे न्यूज

Open chat
1
Is there any news?