Views: 122
0 0

Share with:


Read Time:5 Minute, 12 Second
पुणे: “एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी संकल्पना, डिझाईन, नियोजन करून तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर-तुकाराम महाराज विश्‍वशांती घुमट या अद्वितीय अशा वास्तूशिल्पाची निर्मिती ही राजबाग, लोणीकाळभोर, पुणे, महाराष्ट्र येथे केली आहे. या घुमटाचा व्यास १६० फूट व उंची २६३ फूट आहे. आणि २४ पिलर्स आहेत. याची आम्ही सर्व प्रकारे पहाणी केली. आमच्या असे लक्षात आले की, हा घुमट जगातील सर्वात मोठा विश्‍व शांतीचा घुमट आहे. म्हणूनच वर्ल्ड बुक ऑफ रेकार्डसतर्फे हे प्रमाणपत्र दिले आहे.” असे उद्गार लंंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे उपाध्यक्ष डॉ. राजीव श्रीवास्तव यांनी काढले. एमआयटी वर्ल्ड पीस युुनिव्हर्सिटीतर्फे कोथरुड येथील संत श्री ज्ञानेश्‍वर सभागृहात  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी लंंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे उपाध्यक्ष डॉ. राजीव श्रीवास्तव, डब्ल्यू.बी.आर.महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मेहबूब चांदभाई सय्यद यांनी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. विजय दास, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, विश्‍वशांती केंद्र(आळंदी)चे सल्लागार व माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, डब्ल्यूपीयूचे सल्लागार डॉ. संजय उपाध्ये आणि डॉ. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
डॉ. राजीव श्रीवास्तव म्हणाले,“आमची संस्था जगातील अशा काही घटनांचा शोध घेऊन त्याची पहाणी करते आणि त्यानंतर त्यांना संस्थेतर्फे प्रमाणपत्र देते. त्यातच डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी उभा केलेला जगातील सर्वात मोठा विश्‍वशांती घुमट हा जगातील संपूर्ण मानवजातीला विश्‍वशांती आणि मानवकल्याणाचा संदेश देईल. ३ हजार लोक बसतील असे विश्‍वशांती प्रार्थना सभागृह आहे. ६२ हजार ५०० स्केअर फूट असलेले विश्‍वशांती ग्रंथालय आहे. म्हणून हा घुमट अद्वितीय असा आहे. या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळे आम्ही त्यांना हे प्रमाणपत्र देऊन गौरव करीत आहोत.”
डॉ. विश्‍वनाथ कराड म्हणाले,“या अद्वितीय घुमटातून जागतिक दर्जाची तत्वे समोर येणार आहेत. एकीकडे रशिया आणि युक्रेनची लढाई सुरू असतांना विश्‍वशांतीसाठी कार्य करणार्‍या या डोमला असा बहुमान मिळणे हे अभिनंदनीय आहे. आता संपूर्ण जगाला भारतच सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले, “१२ वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे डॉ. कराड यांनी विश्‍वशांती घुमटाची निर्मिती केली आहे. जगातील सर्वात मोठा हा घुमट असला तरी यातून दिला जाणारा संदेश संपूर्ण जगात शांतीसाठी कार्यरत असेल.”
डॉ. विजयकुमार दास म्हणाले,“शिक्षण क्षेत्रात कार्य करीत असतांना डॉ. कराड  शांती, मानवता धर्म आणि सहिष्णूतेसाठी जे कार्य करीत आहेत ते अलौकिक आहे.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, “जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी खूप लोकांनी कार्य केले आहे. परंतू डॉ. कराड यांनी संत ज्ञानेश्‍वर व तुकाराम महाराज यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या घुमटाच्या माध्यमातून शांतीसाठी कार्य सुरू केले आहे. आजच्या काळात सर्वात महत्वाचे आहे.”
प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मिलिंद पात्रे यांनी आभार मानले.
Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?