हॉटेलमधील वेटरची फेसबूक लाईव्ह करत इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या
Views: 225
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 51 Second

पुणे, 20 नोव्हेंबर : पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रसिद्ध हॉटेलमधील वेटरने फेसबूक लाईव्ह  करत इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेतल्याची घटना समोर आली आहे. रेस्टॉरंट इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेत वेटरने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मृतक वेचरचं नाव अरविंद सिंह राठौर असे असून तो 26 वर्षांचा होता.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अरविंद सिंह राठौर हा मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे. मुंढवा परिसरातील हॉटेल पेंट हाऊस मध्ये तो एक महिन्यापूर्वीच कामाला लागला होता. घटनेपूर्वी अरविंद याने फेसबूक लाईव्ह करत हॉटेलमधील काही लोकांनी त्याला फसवल्याचा आरोप केला व त्यामुळेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतलाच सांगितले जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अरविंद हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ही घटना बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

अरविंद याने आत्महत्येपूर्वी फेसबूक लाईव्ह करत हॉटेलमधीलच काही कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा आरोप केला आहे. फसवणूक झाल्याचा आरोप करत त्याने टोकाचं पाऊल उचलंल आणि मग इमारतीच्या 13व्या मजल्यावरुन उडी घेतली. अरविंद याच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अरविंद याने आत्महत्या का केली, त्या मागचं नेमकं कारण काय आहे? तसेच त्याने आरोप केल्याप्रमाणे कुणी फसवणूक केली आहे? याचा पोलीस तपास करत आहेत. यासोबतच तो मानसिक तणावात होता का? किंवा कौटुंबिक वाद होता का? याबाबतही पोलीस अधिक माहिती घेत तपास करत आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?