राज्यातील विविध विद्यापीठांच्या या शैक्षणिक वर्षातील उर्वरित परीक्षा या ऑफलाइन माध्यमातून होणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत 
Views: 308
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 27 Second

मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन  माध्यमातून घेण्याचा निर्णय झाला होता. आता राज्याच्या विविध विद्यापीठांतील परीक्षा ऑफलाइनच  माध्यमातून होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंसोबत बैठक घेतली. त्यामध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.

कुलगुरूंच्या बैठकीमध्ये ऑफलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात बहुसंख्य विद्यापीठ कुलगुरु ठाम आहेत असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.परीक्षा घेताना विध्यार्थ्यांना प्रश्न संच विद्यापीठ देणार आहे. दोन पेपर मध्ये २ दिवसाचे अंतर असणार आहे. तसेच परीक्षा मे मध्ये न घेता १ जून ते १५ जुलैपर्यंत होतील यावर कुलगुरुंसोबतच्या बैठकीत निर्णय झाल्याचे उदय सामंत म्हणाले.

करोना काळात विद्यार्थ्यांची शिकवणी ऑनलाइन झाल्यानंतर आता परीक्षा देखील ऑनलाइन घ्या अशी मागणी विद्यार्थी वर्गाकडून करण्यात आली होती. पण आता करोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आल्यानंतर राज्यसरकारने नियम शिथिल केले आहेत. या पार्श्वभूमीवर पुढील परीक्षा ऑफलाइन माध्यमातून होतील असे उदय सामंत यांनी जाहीर केले होते. दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या बैठकीत ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. आता राज्यातील सर्व विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन माध्यमातून होतील यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
100 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “राज्यातील विविध विद्यापीठांच्या या शैक्षणिक वर्षातील उर्वरित परीक्षा या ऑफलाइन माध्यमातून होणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?