पिंपरी चिंचवड: मोहननगर येथील दोन्ही दफनभूमीत जागा शिल्लक नसल्यामुळे फूटपाथ व डांबरी रस्त्यावर मृतदेहाचा अंत्यविधी करावा लागत होता. त्यामुळे मृतदेहाची विटंबना होत होती. या गंभीर प्रश्नाबाबत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दि.१६/२/२०२२ रोजी निवेदन देऊन नाईलाजास्तव तीव्र आंदोलन करुन हे आंदोलन करताना महापालिकेच्या मुख्यालयासमोर मृतदेहाचा अंत्यविधी केला जाईल, असा लेखी इशारा भापकर यांनी प्रशासनाला दिला होता. या मागणी बाबत सर्व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी ठळक प्रसिद्धी दिली होती. यावर आयुक्त राजेश पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांना दफनभूमीचे हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे आदेश दिले होते.
अतिरिक्त आयुक्त ढाकणे यांनी तत्काळ संबंधित विभागाचे प्रमुख अनिल रॉय कार्यकारी अभियंता राजेन्द्र पवार व देशपांडे व इतर अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक लावली. पवना बँके शेजारील दफनभूमीत क्र.१ तातडीने सुरू करण्यात येईल. तसेच या दफनभूमीत उर्वरित भागात चार फुटी पोयटा माती भरण्याचे काम देखील तातडीने सुरू केले जाईल,असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे अत्यंत तातडीने स्मशानभूमीत पोयटा माती भरण्याचे काम वेगात सुरू करण्यात आले. तीन आठवड्यात संपूर्ण स्मशानभूमीत माती भरण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले होते. अखेर भापकर यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केल्याने हे काम पूर्ण झाले आहे. वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे, अशोक बहिरवाडे, सुरेश लंगोट,अशोक नामदे, विजय मिसाळ, रामा बहिरवाडे,अक्षय नामदेव तसेच आद्यगुरू जाम्बुंमुनी समाज महासंघाचे अध्यक्ष मारुती अण्णा पंद़ी, रेवन आप्पा पल्ले, हनुमंत ढोल, लक्ष्मण अस्वदे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर व महापालिकेचे प्रतिनिधींनी प्रत्येक्ष जागेवर पाहणी केली. या दफनभूमीत पाण्याची व्यवस्था करणे, बसण्यासाठी बेंच टाकणे, पाण्याची टाकी दुरुस्त करून पाण्याचे कनेक्शन बसवणे,या भागातील कचरा उचलणे आदि समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी आम्ही सगळ्यांनी केली. आमच्या वरील मागणीची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने हे काम करून या परिसरातील लिंगायत गवळी समाज, मोची,मादगी,वाणी आदी दफनविधी करणाऱ्या सर्व समाजाच्या मोठ्या समस्यांचे निवारण झाल्याबद्दल महापालिका प्रशासन व हे काम पूर्ण करून घेणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्याबद्दल समाधान व्यक्त केले. मोहननगर,चिंचवड स्टेशन, गवळीवाडा, आनंदनगर,साईबाबा नगर, इंदिरानगर काळभोरनगर, आकुर्डी, निगडी, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, शाहूनगर संभाजी शाहुनगर मधील या दफनभूमीचा लाभ घेणाऱ्या नागरिकांनी मारुती भापकर यांना प्रत्येक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे फोन करून आभार व्यक्त करत आहेत.
… [Trackback]
[…] Read More Info here to that Topic: marathi.reportertodaynews.com/the-question-of-the-cemetery-at-mohannagar-was-raised-citizens-thanked-maruti-bhapkar/ […]
… [Trackback]
[…] Read More to that Topic: marathi.reportertodaynews.com/the-question-of-the-cemetery-at-mohannagar-was-raised-citizens-thanked-maruti-bhapkar/ […]