पुणे, दिः२, ऑक्टोबरः “ मानवता, विश्वकल्याण आणि विश्वशांतीसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी कार्य केले. त्यांनी सांगितलेल्या शांती आणि अहिंसा या तत्वांना आपल्या जीवनात उतरविल्यास जीवन सुंदर बनेल.” असे विचार माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी केले.
माईर्स एमआयटी शिक्षण समूहाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. विश्वनाथ दा. कराड त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी ते बोलत होते.
या वेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, डॉ. मिलिंद पात्रे, डॉ. गुरूप्रसाद राव आणि सर्व विभागतील संचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. कराड म्हणाले,“ या दोन्ही पुण्यात्मांनी सर्व कार्य मानवहितासाठी केले आहे. त्यामुळे आजचा दिवस हा संकल्पाचा असून तो सिद्धीस नेण्याचा आहे. भगवद्गीता ही जिवनाला दिशा दाखविते. गांधी म्हणत असे की माझे मन जेव्हा शंका कुशंकांनी भाबावून जात असे तेव्हा गितेचा आधार घेत असे. भगवद्गीता ही संपूर्ण मानवजातीला मिळालेली एक देणगी आहे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,“ महात्मा गांधी यांच्या तत्वांचे पालन करून माईर्स एमआयटी शिक्षण संस्था १९८३ पासून शांतीवर कार्य करीत आहे. जनतेवर होणारा अन्याय कमी करण्यासाठी त्यांनी शांती आणि अहिंसा मार्ग अवलंबविला. रविंद्रनाथ टागोर यांनी गांधी यांना महात्मा ही पदवी दिली तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रपिता ही पदवी दिली होती.”
डॉ. मिलिंद पात्रे म्हणाले, म. गांधी यांनी सतत स्वतःवर प्रयोग करून विश्वात क्रांती निर्माण केली. करा किंवा मरा असे साधारण तत्व सांगून जनतेत जागृती निर्माण केली. त्यांनी ज्या पद्धतीने शांतीसाठी कार्य केले त्याच तत्वानुसार डॉ. कराड हे विद्यापीठाच्या माध्यमातून विश्वशांतीसाठी कार्य करीत आहेत.”
त्यानंतर डॉ. प्रसाद खांडेकर, डॉ.दिनेश खिस्ती, डॉ. गुरूप्रसाद राव आणि डॉ. भागवत बिराडी यांनी म. गांधी व लाला बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी सांगितलेल्या तत्वाचे पालन करण्याचे आवाहन केले.