पिंपरी चिंचवड: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जनवाणी संस्थेच्या माध्यमातून, विविध महिला बचत गटांच्या सहकार्याने, आज पर्यावरण रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
सेक्टर २२ मधील, यमुनानगर शासकीय रुग्णालया पासून अंकुश चौक ते काळभोर गोठा पर्यंत रॅली काढण्यात आली.
वृक्ष लागवडीचा संदेश देत, घोषणा देत परीसरात जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रामुख्याने लहान मुलांचा, महिला बचत गटांचा सहभाग होता.
वसुंधरेची शपथ घेत रॅलीला सुरूवात करण्यात आली.
तसेच महिला बचत गटांच्या हातुन वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी,
आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे , माजी नगरसेवक सचीन चिखले, तानाजी खाडे तसेच सामाजिक कार्यकर्ते,
श्री समर्थ महिला बचत गट, प्रगती महिला बचत गट, स्वविकास महिला बचत गट. जनवाणी संस्थेचे टिम लिडर, संदिप आडागळे, प्रभाग प्रभारी ज्ञानेश्वर शेळके. सर्व जनवाणी पर्यवेक्षक उपस्थित होते.