राज्यात सर्वाधिक बोगस शिक्षक चक्क नाशिकमध्ये असल्याचे आले समोर; पालकवर्ग चिंतेत
Views: 4979
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 31 Second

नाशिकः पालकांना काळजीच्या खाईत लोटणारी एक अतिशय धक्कादायक बातमीसमोर आली आहे. राज्यात सर्वाधिक बोगस शिक्षक चक्क शिक्षण पंढरी नाशिकमध्ये असल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळला जाणारा हा खेळ नेमका किती दिवसांपासून सुरू होता, हे तूर्तास समजायला मार्ग नाही. मात्र, आरोग्य परीक्षा, म्हाडा परीक्षा आणि आता टीईटी (TET) गैरव्यवहार प्रकरणाने पुन्हा एकदा अनेकांची झोप उडालीय. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत पाळेमुळे खणली. तेव्हा एकेक धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी सर्वाधिक बोगस शिक्षक नाशिकमध्ये आढळले. त्यांची संख्या 1154 आहे. त्यानंतर धुळ्यात 1002, नंदुरबारमध्ये 808, जळगाव 614, पुणे 395, बीड 338 आणि सर्वात कमी बोगस शिक्षक हे गोंदिया जिल्ह्यात 9 आहेत. पुणे पोलिसांना म्हाडा परीक्षेच्या पेपरफुटीचा तपास करताना डॉ. प्रीतीश देशमुख, अंकुश हरकळ, संतोष हरकळ यांना बेड्या ठोकल्या. तेव्हा हे बोगस शिक्षक प्रकरण समोर आले. या संशयितांच्या लॅपटॉपमध्ये चक्क 2019-20 मधील 1270 परीक्षार्थींची यादी सापडली. या घोटाळ्यात आतापर्यंत पोलिसांनी जवळपास 15 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

 

राज्यात 2019 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा झाली. ही परीक्षा 3 लाख 43 हजार 284 जणांनी दिली. त्यातील 16705 जण पास झाले. यापैकी जवळपास 7880 जण हे पैसे देऊन या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. अटक केलेल्या संशयिताकडे या परीक्षार्थींकडून घेतलेले 4 कोटी 68 लाख पोलिसांनी जप्त केले आहेत. मात्र, हे झाले फक्त 2019 या वर्षातील परीक्षेचे. त्यापूर्वी शिक्षक भरती कशी झाली, ते उमेदवार तरी पात्र होते का, असा प्रश्न आता निर्माण होतोय.

पुणे पोलिसांनी मोठ्या धडाडीने टीईटी घोटाळ्याच्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात मंगळवारी या प्रकरणी 3 हजार 995 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामध्ये या परीक्षेत तब्बल 7 हजार 888 अपात्र उमेदवारांना उत्तीर्ण केल्याचे म्हटले आहे. यामुळे राज्यभरातील पालक चिंतेत आहेत. आपल्या मुलांना योग्य शिक्षक शिकवतात का, असा प्रश्न त्यांना या स्पर्धेचा युगात पडला नसेल, तर नवलच म्हणावे लागेल.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
50%
4 Star
50%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

1,437 thoughts on “राज्यात सर्वाधिक बोगस शिक्षक चक्क नाशिकमध्ये असल्याचे आले समोर; पालकवर्ग चिंतेत

  1. Hello, i feel that i noticed you visited my website so i got here to return the desire?.I am trying to in finding things to improve\r\nmy website!I suppose its adequate to make use of a few of\r\nyour concepts!!\r\n\r\nCheck out my website : ytmp3