पुणे : विकास व रोजगारासाठी राज्यातील उद्योग क्षेत्राला आवश्यक ते सर्व सहकार्य महाराष्ट्र राज्य शासनातर्फे करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिकआरोग्य व कुटुंब कल्याण विभाग,कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.ते शुक्रवारी पुणे येथील भांडारकर इन्स्टिट्यूट मधील नवलमल फिरोदिया सभागृहात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम)च्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘उद्योगक्षेत्राच्या कौशल्य विकास व रोजगार विभागाकडून असलेल्या अपेक्षा’या विषयावर संवाद सत्र कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी उद्योगक्षेत्राच्या नेमक्या गरजा लक्षात घेऊन उद्योगजगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ सहजगत्या उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनातर्फे योग्य धोरण आणि योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रभावी उपाययोजना लवकरच तयार करण्यात येतील व त्याबाबत येत्या महाराष्ट्र दिनाला १ मे रोजी अधिकृत घोषणा करण्यात येईल असेही राजेश टोपे यांनी सांगितले. अप्रेन्टिस योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीही आवश्यक ते धोरणात्मक बदल करण्यात येतील तसेच कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन करणे, तसेच रोजगार विभागाचे पोर्टल निर्माण करणे यासारख्या उपाययोजना लवकरच करण्यात यातील असेही टोपे यांनी सांगितले. यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी सांगितले की, अप्रेंटिसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी यासाठी राज्यातील सरकारी आयटीआयच्या मोकळ्या जमिनींवर उद्योजगताच्या सीएसआरच्या माध्यमातून वसतिगृहे उभारण्यात येतील. आयटीआय चे विद्यार्थी व अप्रेन्टिसशिपसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहांचा उपयोग होणार आहे. उद्योगजगताची कुशल मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक संस्थानीही विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख तंत्रज्ञान अवगत करून द्यावे असे आवाहनही त्यांनी केले. तर राज्याच्या कौशल्य, रोजगार, नाविन्यता व उद्योजकता विभागाचे आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनीही आपल्या मनोगतात राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या व आगामी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी बॉश चासिस सिस्टम इंडिया प्रा. लि. चे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक मोहन पाटील,ल्युपिन कंपनीच्या सीएसआर विभाग प्रमुख तुषारा शंकर, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडिया. प्रा. लि. च्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे महाव्यवस्थापक विश्वनाथ येरवा यांनी आपल्या मनोगतातून कौशल्य विकास व रोजगार विभागाकडून उद्योगजगताच्या काय अपेक्षा आहेत याविषयी सविस्तर विवेचन केले. यावेळी एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी,व्यवसाय प्रशिक्षण संचनालयाचे संचालक दिगंबर दळवी,एनआयपीएमच्या पुणे विभागाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार,व्यवसाय प्रशिक्षण संचलनालयाचे सहसंचालक योगेश पाटील, व्यवसाय प्रशिक्षण विभागाच्या प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक चंद्रकांत निनाळे, यांच्यासह कौशल्य विकास विभागाचे विविध पदाधिकारी व पुणे पिंपरी चिंचवड, हिंजवडी, चाकण आदी परिसरातील विविध औद्योगिक कंपन्यांचे मनुष्यबळ व्यवस्थापक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनआयपीएमच्या पुणे विभागाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी, तर आभार प्रदर्शन एनआयपीएमच्या पुणे विभागाचे सचिव प्रकाश बिमलखेडकर यांनी केले.
*फोटो ओळ :*
*१)* पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमधील सभागृहात एनआयपीएम च्या वतीनेआयोजित ‘उद्योगक्षेत्राच्या कौशल्य विकास व रोजगार विभागाकडून असलेल्या अपेक्षा’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्याचे सार्वजनिकआरोग्य व कुटुंब कल्याण विभाग,कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री राजेश टोपे, यावेळी व्यासपीठावर बसलेले डावीकडून एनआयपीएमच्या पुणे विभागाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, व्यवसाय प्रशिक्षण संचलनालयाचे संचालक दिगंबर दळवी,एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी व राज्याच्या कौशल्य, रोजगार, नाविन्यता व उद्योजकता विभागाचे आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह.
*२)* पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमधील सभागृहात एनआयपीएमच्यावतीनेआयोजित ‘उद्योगक्षेत्राच्या कौशल्य विकास व रोजगार विभागाकडून असलेल्या अपेक्षा’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्याचे सार्वजनिकआरोग्य व कुटुंब कल्याण विभाग,कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री राजेश टोपे, यावेळी व्यासपीठावर बसलेले डावीकडून एनआयपीएमच्या पुणे विभागाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, व्यवसाय प्रशिक्षण संचलनालयाचे संचालक दिगंबर दळवी,एनआयपीएमचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी व राज्याच्या कौशल्य, रोजगार, नाविन्यता व उद्योजकता विभागाचे आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह व समोर उपस्थित विविध औद्योगिक कंपन्यांचे मनुष्यबळ व्यवस्थापक पदाधिकारी.