भारतीय असल्याचा अभिमान जागृत करणारा ‘द कश्मिर फाईल्स’  हा चित्रपट नक्कीच एकसंघ भारतासाठी सक्षम पिढी घडवेल – आमदार महेशदादा लांडगे
Views: 411
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 16 Second

पिंपरी चिंचवड: कश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचे चित्रण करणारा ‘द कश्मिर फाईल्स’ या चित्रपटाचा ‘खास शो’ पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वतीने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवकांसाठी आयोजित करण्यात आला. भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेत हा चित्रपट मोफत दाखवण्यात आला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत धर्म जागरण विभाग प्रमुख हेमंत हरहरे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संपर्क मंडल सदस्य विलास लांडगे, पिंपरी-चिंचवड संपर्क विभाग प्रमुख के. उन्नीकृष्णन, शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, उद्योजक शंकर जगताप, प्रदेश सरचिटणीस अमित गोरखे, दक्षिण भारत आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चिंचवड येथील कार्निवल सिनेमागृहात भाजपाच्या वतीने रविवारी ८ वाजताचा ‘द कश्मिर फाईल्स’ हा संपूर्ण शो बूक करण्यात आला होता.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, ‘द काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर ३७० कलम का हटवणे गरजेचे होते? याची जाणीव होते. कश्मिरी पंडितांवर अन्याय, अत्याचार झाले. त्याचे वास्तव भारतीयांपासून लपवण्यात आले. या चित्रपटामुळे भारतातील प्रत्येक नागरिक एकजूट होईल. भारतीय असल्याचा अभिमान जागृत करणारा हा चित्रपट नक्कीच एकसंघ भारतासाठी सक्षम पिढी घडवेल, असा विश्वासही लांडगे यांनी व्यक्त केला.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?