कावेबाज माणसांच्या इर्षेची धूळवड 3 जून रोजी रंगणार मोठ्या पडद्यावर; बहुचर्चित ‘इर्सल’ चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला 
Views: 105
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 10 Second

पुणे: निवडणुका आणि राजकारणातल्या साजूक मुखवट्या मागचं भयाण वास्तव दाखवणाऱ्या  ‘इर्सल’ या मराठी चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर मोठ्या उत्साहात, दिमाखदार सोहळ्यात लॉंच करण्यात आला. भलरी प्रोडक्शनची निर्मिती आणि राज फिल्मची प्रस्तूती असलेला ‘इर्सल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे – विश्वास सुतार यांनी केले आहे. हा मराठी चित्रपट त्याच्या हटके नावामुळे आणि लाक्षवेधी पोस्टरमुळे सध्या चर्चेत आहे. लॉंच झालेल्या ट्रेलर वरून हा चित्रपट राजकारणातील कावेबाज माणसांच्या इर्षेची धूळवड दाखवणार असल्याचे दिसते.

‘इर्सल’ चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुजाता मोगल, अभिनेत्री माधुरी पवार, शरद जाधव, अजिंक्य निकम, विश्वास सुतार, संजय मोहिते, आदर्श गायकवाड, दिग्विजय कालेकर, सुधीर फडतरे, ओंकार भस्मे, केतन विसाळ, हर्षाली रोडगे, नागेश नाईक, आकाश भिकुले, वैशाली घोरपडे, चैताली बर्डे, अप्पासाहेब कुंडले, सर्जेराव जाधव, हनिफ शेख या कलाकारांच्या भूमिका आहेत. तर ट्रेलर आणि गाण्यांमधून लक्ष्यवेधून घेणारी  विक्रम सूर्यकांत आणि शिवानी मोझे पाटील ही फ्रेश जोडी पदार्पण करत आहे.

‘इर्सल’  या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये राजकारणामधील खालच्या फळीत घडामोडी दिसतात. स्थानिक  राजकारण आणि विविध समाजघटकांवर या राजकीय घडामोडींचा होणारा परिणाम यांची झलक या पहायला मिळते. अगदी टीनएजर्स मुलांपासून राजकारणातील बुजुर्ग नेत्यांपर्यंत निवडणूक काळात नेमकं काय काय घडतं हे या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे दिसते.  ‘इलेक्शन म्हणजे समदा डाकू लोकांचा खेळ असतोय’, ‘इथला भाय कोणचं नाय’, ‘नाद केला ना तर बाद करीन’ किंवा  ‘एकदा पाखरू उडालं ना की त्याचा नाद सोडून द्यायचा’, तिकीट, पक्ष असल्या कुबड्या बांडगुळांनाचं लागतात’ असे संवाद प्रेक्षकांवर छाप सोडतात. त्यामुळे या चित्रपटात आणखी काय काय पाहायला मिळेल? याबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुक्ता निर्माण झाली आहे.

अनिकेत बोंद्रे – विश्वास सुतार दिग्दर्शित  ‘इर्सल’चे निर्माते विनायक आनंदराव माने व प्रस्तुतकर्ता सूरज डेंगळे आहेत. ‘नाद करायचा नाय’ फेम संगीतकार दिनकर शिर्के ‘इर्सल’चे गीत – संगीतकार आहेत. चित्रपटातील गीते उर्मिला धनगर, पूरण शिवा, गुल सक्सेना, शाहीर लक्ष्मण पवार यांनी गायली आहेत.  तर नृत्य दिग्दर्शक धैर्यशील उत्तेकर आहेत. कथा अनिकेत बोंद्रे यांची असून, पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची, तर संवाद विश्वास सुतार यांचे आहेत. छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे.  बहुचर्चित ‘इर्सल’ हा मराठी चित्रपट येत्या 3 जून 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed

Open chat
Is there any news?