दाट धुक्यामुळे महापारेषणच्या वाहिन्यांत तांत्रिक बिघाड; महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करून वीजपुरवठा केला सुरळीत
Views: 410
0 0

Share with:


Read Time:5 Minute, 22 Second

पुणे, दि. ९ : दाट धुक्यामुळे महापारेषणच्या वाहिन्यांत तांत्रिक बिघाड होऊन पुणे व परिसरातील काही भागात वीजपुरवठा खंडित झाला. दाट धुक्यामुळे ४०० के. व्ही. चाकण व ४०० के. व्ही. लोणीकंद या पुण्यातील मुख्य ग्रहणकेंद्राकडे येणारा वीजपुरवठा खंडित झाला. यामुळे अन्य ४०० के. व्ही. तसेच २२० के. व्ही. वाहिन्या बंद होऊ नयेत म्हणून पुणे शहर, बारामती, चाकण व औद्योगिक क्षेत्रामध्ये भारनियमन करावे लागले. दरम्यान, महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून अत्यावश्यक सेवा असणाऱ्या रूग्णालये, पाणीपुरवठा, ऑक्सीजन प्रकल्प, रेल्वेसेवा, विमानसेवा या क्षेत्रात मात्र वीजपुरवठा सुरळीत ठेवला.

महापारेषणच्या पुणे विभागातील महत्त्वाच्या ४०० के. व्ही. पारेषण वाहिन्यांपैकी ४०० के. व्ही. तळेगाव-चाकण, ४०० के. व्ही. लोणीकंद-चाकण, ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत१, ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत २ व ४०० के. व्ही. लोणीकंद-कराड या वाहिन्यांमध्ये दाट धुक्यांमुळे इन्सुलेटर डिकॅपिंग होऊन वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, या वाहिन्यांची महापारेषणकडून नियमितपणे देखभाल केली जाते.

तळेगाव-लोणीकंद-चाकण या परिसरात दाट धुक्यामुळे वीजवाहिन्या बंद पडल्या. त्यानंतर स्वयंचलित ऍटो रिक्लोजर वाहिन्या सुरू होण्याच्या प्रयत्नात वेगवेगळ्या ठिकाणी वाहिन्या बंद झाल्या. यामुळे ४०० के. व्ही. चाकणचा विद्युतपुरवठा खंडित झाला. तसेच लोणीकंद-१ व लोणीकंद-२ निगडित तीन ४०० के. व्ही. वाहिन्या बंद पडल्यामुळे तसेच उर्वरित ४०० के. व्ही. वाहिन्यांवर लोड वाढल्यामुळे वेळेत लोड नियंत्रित करणे क्रमप्राप्त झाल्यामुळे पुणे शहर, बारामती, सुपा, आळेफाटा या परिसरात भारनियमन करण्यात आले.

परिणामी सकाळी सहा वाजल्यापासून १००० ते ११०० मेगावॅट भारनियमन करावे लागले. ४०० के. व्ही. कोयना-लोणीकंद वाहिनीव्दारे कोयना विद्युत निर्मिती केंद्राकडून साधारणतः १००० मेगावॅट अतिरिक्त वीज मिळाल्यानंतर सकाळी दहाला पुणे शहर व औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा टप्प्याटप्पाने चालू करण्यात आला.

४०० के. व्ही. तळेगाव-चाकण व ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत १ या वाहिन्या तात्काळ पूर्ववत करण्यात आल्या. दुपारपर्यंत सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत व पूर्ववत करण्यात आला.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, प्रधान सचिव (ऊर्जा) तथा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी वेळोवेळी याबाबत माहिती घेऊन वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना व मार्गदर्शन केले. संचालक (संचलन) अनिल कोलप, पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता जयंत विके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून वीजपुरवठा पूर्ववत व सुरळीत केला.
*घटनाक्रम*
१) ४०० के. व्ही. तळेगाव-चाकण लाईन पहाटे ३.३९ ला बंद पडली.
२) ४०० के. व्ही. चाकण-लोणीकंद लाईन पहाटे ४.३१ ला बंद पडली.
३) ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत-१ लाईन पहाटे ५.५२ ला बंद पडली.
४) ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत-२ लाईन पहाटे ५.२४ ला बंद पडली.
५) ४०० के. व्ही. लोणीकंद-कराड लाईन सकाळी ६.०२ ला बंद पडली.
६) ४०० के. व्ही. तळेगाव-चाकण दुपारी १२.०४ मिनिटांनी सुरू करण्यात आली.
७) ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत-१ दुपारी २.५७ सुरू करण्यात आली.
८) ४०० के. व्ही. लोणीकंद-कर्जत-२ दुपारी ३.४२ ला सुरू करण्यात आली.
९) उर्वरित ३ वाहिन्या संध्याकाळी पाच वाजेपर्यत पूर्ववत करण्यात आल्या.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?