खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांना पाठिशी घालणार्‍या परिवहन आयुक्तांवर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती
Views: 6325
1 0

Share with:


Read Time:6 Minute, 52 Second

मुंबई- राज्य परिवहन महामंडळाच्या गाडीच्या तिकिटाच्या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटाचा दर अधिकतम दीडपटीपर्यंत आकारता येईल, असा शासनाचा निर्णय आहे; मात्र हा शासन निर्णय धाब्यावर बसवून अनेक खासगी ट्रॅव्हल्सकडून दुपटीहून अधिक तिकीट दर आकारून प्रवाशांची भरमसाठ लूटमार केली जात आहे. याची तक्रार करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत शिष्टमंडळाने राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची नुकतीच भेट घेतली. त्या वेळी त्यांनी तक्रारदारांना आश्वासित करण्याऐवजी जबाबदारी झटकणारे उत्तर दिले. या प्रकरणी परिवहनमंत्र्यांनी परिवहन आयुक्तांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांची लूटमार रोखण्यासाठी परिवहन विभागाने ठोस कारवाई करावी; अन्यथा राज्यभर आंदोलन उभारू, अशी चेतावणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’त घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मुंबई, ठाणे, रायगड समन्वयक श्री. सागर चोपदार, तसेच खासगी ट्रॅव्हल्सच्या विरोधात तक्रार करणारे श्री. अभिषेक मुरुकटे हेही उपस्थित होते.

शासनाच्या निर्णयाप्रमाणे खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांचे बूकिंग करणारी तथा गाड्या सुटणारी ठिकाणे येथे शासनाने निश्चित केलेले राज्य परिवहन बसचे दरपत्रक लावावे. त्याविषयी तक्रार असेल, तर तक्रारीसाठी ‘हेल्पलाईन’ क्रमांक द्यावा. लूटमार करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सवर तात्काळ कारवाई करावी, तसेच ऑनलाईन तिकीट विक्री करतांना भरमसाठ दर आकारणार्‍या खासगी प्रवासी टॅ्रव्हल्स एजन्सीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, अशा मागण्याही हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत करण्यात आल्या आहेत.

*संकेतस्थळावरील तक्रारीमुळे काम वाढेल म्हणणारे आयुक्त वेतन कसले घेतात ?*

शिष्टमंडळाने परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे नियमबाह्य तिकीट दर आकारणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सच्या नावांची सूची पुराव्यांसह सुपूर्द केली. त्या वेळी आयुक्तांनी याची दखल घेण्याचे दूरच; पण शिष्टमंडळाने दिलेली कागदपत्रे पहाण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. याउलट त्यांनी तक्रारदारांना ‘कुणी अधिक पैसे घेतल्यास अन्य ट्रॅव्हल्सचे तिकिट काढा. ऑनलाईन वेबसाईटवरून आकारल्या जाणार्‍या किमतीवर आमचे नियंत्रण नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याएवढे मनुष्यबळ आमच्याकडे नाही. कारवाईची माहिती संकेतस्थळावर दिली, तर आमचा उपद्व्याप वाढतो. आम्ही आमच्या सोयीनुसार कारवाई करतो’, असे बेजबाबदारपणाचे उत्तर दिले. डॉ. ढाकणे हे परिवहन आयुक्त आहेत कि जनतेची लूटमारी करणार्‍या खासगी ट्रॅव्हल्सचे प्रवक्ते ? परिवहन आयुक्तच त्यांचे दायित्व झटकत असतील, तर खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी लूटमार कशी थांबणार ? ‘डॉ. ढाकणे यांचे आणि खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांचे काही साटेलोटे आहेत का’, याची सखोल चौकशी शासनाने केली पाहिजे. संकेतस्थळावरील तक्रारींमुळे काम वाढेल म्हणणारे आयुक्त वेतन कसले घेतात ? असा प्रश्न श्री. सतीश कोचरेकर यांनी उपस्थित केला.

*राज्यातील लाखो प्रवाशांची दररोज कोट्यवधी लूट ! -* अभिषेक मुरुकटे, तक्रारदार

मी ‘रेड बस’च्या ॲपवरून मोहन ट्रॅव्हल्स (घाडगे पाटील) या गाडीचे 22 मे 2022 चे मुंबई-कोल्हापूर तिकीट काढले. या तिकिटासाठी माझ्याकडून 1 हजार 995 रुपये घेतले. राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई-कोल्हापूर वातानुकूलित गाडीच्या मुंबई ते कोल्हापूर तिकिटाचा दर 840 रुपये आहे. खासगी ट्रॅव्हल्सना अधिकतम 1 हजार 260 इतके तिकिट आकारता येऊ शकते. तरीही माझ्याकडून तिकिटाचे 735 रुपये अधिक घेण्यात आले. या प्रकारानंतर मी विविध खासगी ट्रॅव्हल्सचे दर पाहिले असता बहुतांश गाड्यांचे दर भरमसाठ असल्याचे आढळून आले. एका प्रवाशाकडून 735 रुपये एवढी अतिरिक्त रक्कम घेतली जात असेल, तर राज्यभरातील लाखो प्रवाशांकडून किती कोट्यवधी रुपये उकळले जात असतील, याची कल्पना येते. राज्यातील लाखो प्रवाशांची अशा प्रकारे होणारी नियमित फसवणूक त्वरित थांबवायला हवी, असे तक्रारदार श्री. अभिषेक मुरुकटे यांनी सांगितले.

सर्वसामान्यांची उघडपणे होत असलेली लूट हा गंभीर विषय आहे. याविषयी नागरिकांनी आवाज उठवावा. कुणाला यासाठी साहाय्य किंवा अधिक माहितीची आवश्यकता असल्यास हिंदु जनजागृती समितीच्या 8080208958 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन श्री. सतीश कोचरेकर यांनी केले.

 

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
35%
4 Star
6%
3 Star
41%
2 Star
6%
1 Star
12%

1,531 thoughts on “खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांना पाठिशी घालणार्‍या परिवहन आयुक्तांवर कारवाई करा – हिंदु जनजागृती समिती

  1. lazfan

    zara ladies dresses womens dirndl liverpool jersey 2019 long sleeve broncos army hat for uk pandora rose gold heart necklace red wing crepe sole