यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएसच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित परिसंवाद संपन्न
Views: 418
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 51 Second

पिंपरी :  स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे सजगतेने लक्ष देणे गरजेचे असून आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष करता कामा नये असे मत प्रसूती आणि स्त्री रोग तज्ञ् डॉक्टर रोहिणी गढीकर यांनी व्यक्त केले.

चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स (आयआयएमएस) तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘नोकरदार महिलांच्या आरोग्य समस्या’ या विषयावरील परिसंवादात त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना त्यांनी धकाधकीच्या जीवनशैलीमुळे नोकरदार महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून याशिवाय पाठदुखी, कर्करोग, स्तनाचा कर्करोग, प्रजनन अंगाचे रोग अशा व्याधींचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः कार्यालयीन काम करणाऱ्या महिलांमध्ये सतत एकाच जागी बसावे लागत असल्याने पाठदुखी, संगणकावरील कामामुळे डोळ्यांचे विकार अशा आरोग्यविषयक समस्या उदभवतात. अशा समस्या निर्माणच होणार नाहीत यादृष्टीने नोकरदार महिलांनी संतुलित आहार, आहारात जीवनसत्व युक्त पदार्थांचा समावेश करायला हवा, तसेच वाढत्या वयानुसार उदभवू शकणारे संभाव्य आजार रोखण्यासाठी नियमितपणे आरोग्याची देखभाल राखणे,वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे,जंक फूडचे अत्याधिक सेवन टाळणे गरजेचे असल्याचे डॉ.रोहिणी गढीकर यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रश्नोत्तर सत्रात महिला सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ.गढीकर यांनी समाधानकारक उत्तरे देत मार्गदर्शन केले.

यावेळी यशस्वी संस्थेतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अश्विनी घनवट यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी संस्थेच्या मनुष्यबळ व्यवस्थापिका मनिषा खोमणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
33%
3 Star
0%
2 Star
33%
1 Star
33%

3 thoughts on “यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएसच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित परिसंवाद संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?