
पुणे : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या एकसष्ठी पूर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ६१ विद्यार्थ्यांच्या हस्ते ६१ झाडांचे रोपण, ६१ दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबीर, ६१ जिल्हा परिषद शाळांना ६१ भगवद्गीता वाटप, वर्षभरात ६१ आरोग्य तपासणी शिबिरे, काव्य संमेलन आदी उपक्रमांतून प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या कल्पक नेतृत्वात गेली २२ वर्षे सूर्यदत्त शिक्षणसंस्था जागतिक दर्जाचे, मूल्याधारित आणि सर्वांगीण विकासाचे शिक्षण देत आहे. सर्वांसाठी शिक्षण हे तत्व घेऊन सामाजिक भावनेतून अनेक शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम ‘सूर्यदत्त’तर्फे सातत्याने राबविण्यात येतात. ज्ञानदानासोबतच सामाजिक कार्यातही ‘सूर्यदत्त’ परिवाराचा सहभाग असतो.
विविध आरोग्य शिबीर, विद्यार्थी-पालकासांठी कार्यशाळा, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह अनुभवाधारित शिक्षण मिळावे, यासाठी औद्योगिक क्षेत्रभेटी, मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, इंटर्नशिप, शैक्षणिक सहली अशा अनेक उपक्रमांचे आयोजन वर्षभर केले जाते. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींना ‘सूर्यदत्त’तर्फे विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. त्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद आयोजिला जातो.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची २७ जून रोजी एकसष्ठी पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने ‘सूर्यदत्त’च्या विद्यार्थी व शिक्षकांच्या वतीने ६१ वृक्ष लावली जाणार आहेत. तसेच विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक व परिसरातील नागरिकांसाठी कवी संमेलन आयोजिले जाणार आहे. दि. ४ जुलै २०२२ रोजी एक दिवसाचे कृत्रिम अवयव प्रत्यारोपण शिबीर आयोजिले जाणार आहे, अशी माहिती ‘सूर्यदत्त’च्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांनी दिली.
एक दिवसाचे अवयव प्रत्यारोपण शिबीर
प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्या एकसष्ठी पूर्तीनिमित्त सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ दिव्यांग रिहॅबिलिटेशन अँड रिसर्च आणि विकलांग पुनर्वसन केंद्र आणि भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय अवयव प्रत्यारोपण शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये ६१ दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात, पाय व कॅलिपर्स वाटप केले जाणार आहे. सोमवार, दि. ४ जुलै २०२२ रोजी हे शिबीर होणार असून, यासाठी २७ जून ते ३ जुलै या कालावधीत नाव नोंदणी करता येणार आहे. कात्रज, येरवडा, पिरंगुट, किवळे, पिंपरी-चिंचवड, वारजे, पाषाण, सिंहगड रोड या ठिकाणाहून दिव्यांगांसाठी मोफत पिकअप व ड्रॉपची व्यवस्था केली आहे. अधिक माहितीसाठी ९७६३२६६८२९, ९४०४२३३७५५, ७२६२०११७७४, ७२६२०११३३८ यावर संपर्क करावा, असे आवाहन संस्थेतर्फे केले आहे.