मुद्रा इंटस्ट्रीज,भोसरी-पुणे येथील कामगारांच्या लढ्याला यश; नोकरी गेल्याबाबत मनसेकडे केली होती तक्रार
Views: 200
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 5 Second

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, सरचिटणीस संतोष धुरी यांच्या मार्गदर्शनात ३ महिन्यांपासून सुरु असलेल्या कामगार लढ्याला अखेर यश प्राप्त झाले

मुद्रा इंटस्ट्रीज,भोसरी-पुणे येथील कामगारांनी तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेकडे नोकरी गेल्याबाबत तक्रार केली होती. कामावर रुजू करून घ्यावं म्हणून कामगार कंपनीच्या गेटवर ठिय्या मांडून बसले होते.
कामगार सेनेच्या वतीने कामगार आयुक्त कार्यालय येथे पाठपुरवठा सुरु करण्यात आला,मालकांशी चर्चा करण्यात आली आणि आज कामगारांना अखेर न्याय मिळाला. सर्व कामगारांना त्यांची थकीत देणी, काम करताना झालेल्या नुकसानाची भरपाई (कॉम्पन्सेशन) आणि नोकरी पुर्ववत मिळवून देण्यात आली.सर्व कामगारांनी खास पुण्याहून मुंबईला येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले.
हा सर्व विषय हाताळत असताना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेसोबत मनसे नेते श्री बाबू वागासकर, नगरसेवक श्री सचिन चिखले, विभाग अध्यक्ष श्री अंकुश तापकीर, कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्री परशुराम साळवे,श्री निलेश पाटील
यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच श्री अक्षय पनवेलकर, श्री अक्षय परवडी आणि प्रसाद सांगळे यांनी कामगारांना न्याय मिळावा म्हणून मेहनत घेतली.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

9 thoughts on “मुद्रा इंटस्ट्रीज,भोसरी-पुणे येथील कामगारांच्या लढ्याला यश; नोकरी गेल्याबाबत मनसेकडे केली होती तक्रार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?