महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची पायमल्ली थांबण्यासाठी गोरक्षकांनी दिले निवेदन
Views: 207
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 49 Second

कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव याठिकाणी जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. हा बाजार फक्त शेतकरी आणि शेतकरी यांच्या करिता असतो परंतु कसाई मोठ्याप्रमाणात येऊन देशी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जातात. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पेठ वडगाव बाजारातून गोवंशाची कत्तलीसाठी वाहतुक होऊ नये व कसायांना बाजारातून हद्दपार केले जावे यासाठी आज दि. 20/06/2022 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पेठ वडगावचे अध्यक्ष श्री सुरेश पाटील यांना कोल्हापूरचे बंडादादा साळुंखे , मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी व विनायकदादा माईनकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो गोरक्षकांनी एकत्र येऊन निवेदन दिले. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोवंशहत्या खपवून घेतली जाणार नाही व कसायांना अभय देऊन गोवंशाच्या कत्तलीसाठी मदत करणार्‍यांना माफ केले जाणार नाही असे मत श्री बंडादादा साळुंखे यांनी मांडले…श्री विनायकदादा माईनकर यांनी कसायांना बाजारात येऊ देऊ नये…जनावरांचा बाजार हा फक्त शेतकऱ्यांसाठी आहे अश्या कडक शब्दांत खडसावले…व जर बाजार समितीने कसायांच्या बाबतीत कठोर पावले उचलली नाही आणि त्यांना सहानुभूती दिली तर आम्ही बाजारसमितीच्या विरोधात मोठा मोर्चा काढू आणि आपल्या विरोधात न्यायालयात जाऊ असे शिवशंकर स्वामी म्हणाले…आज बाजार चालू असताना 100 हुन अधिक गोरक्षक बाजारात ” जय गोमाता ” , ” जय भवानी – जय शिवाजी “, ” गोवंशाची कत्तल करणार्‍या कसायांच करायच काय , खाली डोक वर पाय “, ” कसायांची दलाली करणार्‍यांच करायच काय , खाली डोक वर पाय ” आशा घोषणा देताच कसाई सैरावैरा पळत सुटले…कसायांना पळता भुई थोडी झाली…तेथुन पुढे वडगाव पो. स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. तळेकर साहेबाना भेटून निवेदन देण्यात आले व बेकायदेशीर गोवंशाची वाहतुक व कत्तल करणार्‍या कसायांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती बंडा दादा साळुंखे यांनी पोलिसांना केली…यावेळी निवेदन दिल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील गोरक्षकांनी मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला..! यावेळी विनायक आवळे , सुजित कांबळे , महेश कोरवी , सिद्धार्थ कटकधोंड , किरण कोळी , प्रसाद कारंडे , किरण पुरोहित ,प्रकाश हेर्ले,सुनिल पेंटर,मोटु जाधव, शिवाजी हंडे, तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान , सेववर्त प्रतिष्ठान , विश्वहिंदू परिषद बजरंग दल इत्यादी संघटनांनी सहभाग घेतला होता.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?