दहीहंडीला खेळाचा दर्जा: गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करुन प्रो गोविंदा म्हणून स्पर्धा राबवाव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Views: 334
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 52 Second

मुंबई, 18 ऑगस्ट : दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गेल्या बऱ्याच वर्षांपासून दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गोविंदा आणि पथकांकडून करण्यात येत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची ही मागणी पूर्ण केली आहे. दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे गोविंदांनाही याचा फायदा होणार आहे.

खेळाचा दर्जा मिळाल्यामुळे गोविंदांना राज्य सरकारने सरकारी नोकरीत खेळाडूंसाठी दिलेल्या 5 टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय 18 वर्षांवरील कॉलेजमध्ये जाणाऱ्या गोविंदांना ग्रेस मार्कही मिळू शकतात. तसंच थर लावण्याचा सराव करायचा असल्यास गोविंदांना कॉलेजच्या वेळेतूनही जायची परवानगी मिळू शकेल.

 

दहीहंडीमध्ये सहभागी झालेल्या गोविंदांना विमा कवचही मिळणार आहे. दुर्देवाने एखाद्याचा मृत्यू झाला तर आपण 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जबर जखमी झाला तर त्याला साडेसात लाख रुपये आणि हात-पाय मोडला किंवा फॅक्चर झाला तर पाच लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विम्याबाबतचा निर्णय फक्त या वर्षीसाठी लागू असेल.
दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

 

गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करुन प्रो गोविंदा म्हणून स्पर्धा राबवाव्यात. राज्य शासनाकडून या स्पर्धा चालू केल्यानंतर बक्षीसं हे राज्य शासनाकडून मिळतील, अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


रिपोर्टर टुडे न्यूज

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

20 thoughts on “दहीहंडीला खेळाचा दर्जा: गोविंदा उत्सवाचा क्रीडा प्रकारात समावेश करुन प्रो गोविंदा म्हणून स्पर्धा राबवाव्यात – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  1. … [Trackback]

    […] There you can find 56209 more Info on that Topic: marathi.reportertodaynews.com/sports-status-for-dahihandi-govinda-utsav-should-be-included-in-sports-and-competitions-should-be-organized-as-pro-govinda-chief-minister-eknath-shinde/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?