विशेष दिन : क्रांतिकारी योद्धा बाबुराव शेडमाके
Views: 1098
0 0

Share with:


Read Time:7 Minute, 0 Second

क्रांतिकारी योद्धा बाबुराव शेडमाके यांचा जन्म चंद्रपूरच्या एका राज घराण्यात झाला. बाबुरावांचे बालपण सुखवस्तू कुटंबात गेले असले तरी बाबुराव लहानपणापासून जमीनदार, ठेकेदार यांचा सामान्य जनतेवर होत असलेल्या अन्याय- अत्याचार ते पाहत होते. बालवयापासूनच त्यांच्या मनामध्ये या जुलमी व्यवस्थेबद्दल तीव्र असंतोष खदखदत होता. पुढे जेव्हा ब्रिटिशांनी भारतात आपले साम्राज्य स्थापन करून सामान्य जनते वर अत्याचार सुरू केले तेव्हा या रोषाचे रुपांतर आंदोलनात झाले.

 

ब्रिटिश साम्राज्याविरोधात लढण्याचा संकल्प

चंद्रपूर भागात परधान, हलबी, गोंड, माडिया, हलबी ई. आदिवासींचे वास्तव्य होते. भारतात इंग्रजांची सत्ता आल्यानंतर साधारण डिसेंबर १८५४ रोजी चंद्रपूर ला नवीन कलेक्टरची नियुक्ती झाली. या भागात इंग्रजांनी पाय रोवायला सुरवात केली. दरम्यान क्रिस्टन मिशनर्यांचे प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढायला लागले. आदिवासींना विकासाच्या नावावर धर्म परिवर्तन करण्यास प्रवृत्त करायला सुरवात झाली. आदिवासींचा जल, जंगल, जमिन यावर समूहीक अधिकार होता पण नंतर ब्रिटिशांद्वारे त्या क्षेत्रातील वन संपत्ती, खनिज संपत्तीचा मोठ्या प्रमाणात नाश करण्यात येऊ लागला. त्याचबरोबर आदिवासींच्या सामुदायिक आणि सांस्कृतिक जीवन पद्धतीवर गधा येऊ लागली. या गोष्टींचा बाबुराव शेडमाकेंवर मोठा प्रभाव पडला. त्यांनी या अन्यायाविराधात आपला आवाज प्रखर करायला सुरवात केली. त्यासाठी मरे पर्यंन्त ब्रिटिशांविरुद्ध लढत राहण्याचा संकल्प त्यांनी केला.

 

संगोम सेनेची स्थापना

ब्रिटिशांविरोधात लढण्याकरता बाबूराव शेडमाके यांनी ‘संगोम सेनेची’ स्थापना केली. घोट, अडपल्ली व इतर गावांमधून जवळपास ५०० आदिवासी तरुण त्यांनी यासाठी जमा केले. युवकांची फौज उभारुन त्यांनी आदिवासी युवकांना गनिमी काव्याचे प्रशिक्षण दिले. आदिवासींना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यास तयार केले.

 

राजगड वर हमला

राजगड हे क्षेत्र त्याकाळी ब्रिटिशांच्या अधिपत्यात होते. राजगड येथे हमला करून त्यांनी आपल्या संघर्षाची सुरुवात केली. शेडमाके यांनी आदिवासी युवकांना सोबत घेऊन राजगडवरचा हल्ला यशस्वी केला. बाबूराव शेडमाकेंचा यामुळे ब्रिटिशांनी चांगलाच धसका घेतला. राजगडच्या पराभवानंतर ब्रिटिशानी अनेक वेळा आपले ब्रिटिश सैन्य बाबुरावांवर हमला करण्यास पाठवले. मात्र ब्रिटिशांच्या डगळे धारी सैन्अचा बाबूरावांच्या पहाडी सैन्यासमोर कधीच टिकाव लागू शकला नाही.

 

राणी व्हिक्टोरियाचा बाबूराव शेडमाकेंना पकडा म्हणुन फर्मान

दरम्यान बाबूराव शेडमाकेंच्या नेतृत्वात संगोम सेनेने ब्रिटिशांच्या टेलिफोन शिबीरावर हमला केला. या हल्ल्यात ब्रिटिशांचे दोन टेलिफोन ऑपरेटर मृत पावले. टेलिफोन शिबिरावरील हल्ल्याने संदेशवहण यंत्रणाच पुर्णपणे कोलमंडली. राणी व्हिक्टोरिया पर्यंत बाबूराव शेडमाकेंचा हा प्रताप पोहोचला. राणी व्हिक्टोरियासुद्धा शेडमाकेंचे पराक्रम ऐकून आवाक झाली आणि पुढचा धोका ओळखून राणीने बाबूराव शेडमाकेंना कसल्याही परिस्थितीत अटक करा असा फर्मान काढला.

 

आणि ब्रिटिशांनी कट रचू बाबूराव शेडमाकेंना अटक केली..

बाबुराव शेडमाकेंच्या हालचाली ब्रिटिशांच्या चागल्या अंगलटी येऊ लागल्या होत्या. त्यामुळे काहीही करुन बाबुराव शेडमाकेंना पकडने ब्रिटिशांसाठी आवश्यक झाले होते. परंतू बाबुराव शेडमाके गनिमी पद्धतीने लढत होते. ब्रिटिश त्यांच्या गनिमी काव्यासमोर फिके पडत होते. म्हणुन मग ब्रिटिशांना कट रचून बाबूराव शेडमाकेंना अटक करण्याचे ठरवले. त्यासाठी ब्रिटिशांनी बाबुराव शेडमाके यांची आत्या लक्ष्मीबाई (जमीनदार, अहेरी क्षेत्र) यांचा आसरा घेतला. ब्रिटिशांनी दाखवलेल्या अमिषाला बळी पडून लक्ष्मीबाई यांनी शेडमाकेंना पकडण्याच्या कामी ब्रिटिशांना मदत करण्यास होकार दर्शवला. आणि १६ सप्टेंबर १८५८ रोजी बाबूराव शेडमाकेंना कट रचून पकडण्यात ब्रिटिशांना यश आले.

 

झाडाला लटकवून फाशी

बाबुराव शेडमाकेंना पकडून ब्रिटिशांनी त्यांना चंद्रपूरच्या जेल मधे डांबून ठेवले. बाबूराव शेडमाकेंची ब्रिटिशांनी चांगलीच भिती खाल्ली होती. शेडमाके जिवंत राहीले तर ब्रिटिश साम्राज्याला सुरुंग लागेल अशी भिती वाटून त्यांना फाशी देण्याचा ठरवण्यात आले. आणि अखेर १८ सप्टेंबर १८५८ रोजी चांदा सेंट्रल जेल (सध्याचा चंद्रपूर जेल) येथे एका पिंपळाच्या झाडाला लटकवून वीर बाबू शेडमाके याला फाशी देण्यात आली

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?