पिंपरी चिंचवड: आपणा सर्व आत्म्यांचे पिता निराकार शिव परमात्मा या सृष्टीवर अवतरीत झाले आहेत आणि लवकरच हा भारत देश स्वर्णीम बनणार आहे असा संदेश पिंपरी सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी सुरेखा दीदी यांनी दिला. महाशिवरात्री आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय पिंपरी सेवाकेंद्राच्या वतीने ज्योतिबा उद्यान, पवना नगर ,काळेवाडी या ठिकाणी चार दिवसीय शिव दर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या उद्घाटनाची सुरुवात ईश्वराच्या नाम स्मरणाद्वारे झाली. महोत्सवाचे मुख्य आकर्षण 14 फूट उंचीचे भव्य शिवलिंग , बारा ज्योतिर्लिंग दर्शन असे असून अध्यात्मिक शिवचित्र प्रदर्शनीही लावण्यात आली होती. वर्तमान समयी चारही दिशांना अत्याचार, भ्रष्टाचार,पापाचार, असत्यता यांचा प्रभाव आहे. मनुष्य दुःखी आणि अशांत आहे म्हणून स्वतःला आत्मिक स्वरूपात स्थित करा . निराकार शिव परमात्म्याचे नामस्मरण करा . सहज ईश्वरीय ज्ञान व राजयोगाचे शिक्षण विनामूल्य घेण्यासाठी ब्रह्मा कुमारीज विद्यालयाशी संपर्क साधा असे प्रतिपादन सुरेखा दीदी यांनी केले .विद्यमान नगरसेवक संदीप वाघिरे , उषाताई (माई)काळे ,माजी नगरसेवक कैलास थोपटे , प्रमोद ताम्हणकर सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र तायडे ,राजन नायर,काळुराम नढे , अरुण पवार,बाबा जगताप डॉक्टर संजय देवधर यांच्या हस्ते शिवाची महाआरती करण्यात आली. समाज प्रबोधनकार शारदाताई मुंढे व सिद्धकला भजनी मंडळाने भारूड सादर केले. रोहिणी घोडेकर , सागर आणि बी.के.प्रकाश यांनी संगीत संध्या सादर केली. त्याच बरोबर अनेक आजी माजी नगरसेवकांनी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते महाशिवरात्रीच्या दिवशी मोफत आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम बी. के. सुरेखा दीदी, बी. के. सुप्रिया , नेहा, प्रीती, प्रियांका, पूजा, अपूर्वा ,ऐश्वर्या,वर्षा मोरे, सुनंदा भोसले,रुपाली जगताप,वनिता नवानी ,मूर्तिकार आनंद इंगळे , अनुप पाटील, दत्ता आल्हाट व निलेश थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय शिंदे यांनी केले.