ट्रॅक्टर चोरी केलेल्या आरोपीला सोनई पोलिसांनी केली अटक
Views: 98
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 41 Second

अहमदनगर: नेवासा तालुक्यातील चांदा शिवारातून काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी स्वराज कंपनीचा एक ट्रॅकटर चोरी केल्याची घटना घडली होती.सदर घटनेसंदर्भात ओमकार अण्णासाहेब म्हस्के (राहणार गोंदी,ता.गेवराई,जि.बीड) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेचा सखोल तपास करत असताना आरोपींच्या शोधासाठी डम डेटाच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून त्यातील दोन मोबाईल क्रमांक संशयित वाटल्याने त्यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता आरोपी निष्पन्न करण्यात सोनई पोलिसांना यश आले आहे.
यातील आरोपी अक्षय रामा जाधव (रा.पंचशील नगर,अहमदनगर) याला अटक करण्यात आली असून आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली आहे. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता सदर गुन्हा त्याने शिवम गरड व माऊली रसाळ (रा.शेकटे,ता.शेवगाव) यांच्यासह इतर काही साथीदारांच्या मदतीने केला असल्याची माहिती दिली.
आरोपी कडून मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेले सात लाख पन्नास हजार रुपये किंमतीचे स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर हस्तगत करण्यात आले आहे.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे,सपोनि सचिन बागुल यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विक्रम मिसाळ,पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय गावडे,पोलीस नाईक बाबा वाघमोडे,पोलीस कॉन्स्टेबल सचिन ठोंबरे यांनी केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम मिसाळ हे करीत आहेत. सोनई पोलिसांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

You missed

Open chat
Is there any news?