फडणवीसांच्या ऐकण्यात आणि पाहण्यात काहीतरी दोष’, संजय राऊतांचा पलटवार; खोटं न बोलण्याचाही सल्ला!
Views: 644
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 32 Second

मुंबई : पोलिस बदल्यांचा घोटाळा प्रकरणात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांचा मुंबई पोलिसांकडून जवाब नोंदवण्यात आला. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. भाजपच्या नेत्यांनी राज्यभरात पोलिसांच्या नोटिशीची  होळी करत फडणवीसांवर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध केलाय. दरम्यान, पोलिसांनी जवाब नोंदवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. यावेळी फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरही हल्ला चढवलाय. फडणवीसांच्या या टीकेला आता संजय राऊत यांनीही ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलंय.

 

देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ऐकण्यात व पहाण्यात काही तरी दोष निर्माण झालाय. संजय राऊत मर्द शिवसैनिक आहे. घाबरण्याचा प्रश्नच नाही. केंद्रीय तपास यंत्रणा किती खोटे पणाने कारवाया करतात याचा पोलखोल करण्यासाठी मी दोन पत्रकार परिषद घेतल्या.पुराव्यासह. इतकेही खोटे बोलू नका’, असा सल्लाही राऊत यांनी फडणवीसांना दिलाय.

 

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केलीय. ‘मी खुलेपणाने बोललो की मी चौकशीला जायला तयार आहे. संजय राऊत रोज घाबरून पत्रकार परिषद घेतात. रोज केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप करतात. मी तर सांगितलं की मी यायला तयार आहे. कुठे बोलवायचं तिथे बोलवा. त्यांच्यात हिंमत आहे का? ते रोज पत्रकार परिषदेत म्हणतात मला का बोलावलं? मला का बोलावलं? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहजे’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.

 

‘मला पोलिसांनी प्रश्नावली दिली होती. मी उत्तर देणार असल्याचं सांगितलं. काल त्यांनी हजर राहण्याची नोटीस पाठवली. मी सभागृहात रोज विषय मांडत आहे. या सरकारच्या मंत्र्याचं दाऊद कनेक्शन, विरोधी पक्षासोबतचं षडयंत्रं याबाबत मी वारंवार बोलत आहे. त्यामुळे त्यांनी मला नोटीस पाठवली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मी कालच सांगितलं मी जाणार आहे. मग सरकार आणि पोलिसांकडून विनंती केली आम्ही आपल्याकडे चौकशीसाठी येतो. आमचा स्टाफ पाठवतो. त्यानुसार ते आले’, असं फडणवीस पत्रकार परिषदेत म्हणाले.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?