शिवसेनेकडून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभारी समन्वयकपदी वैभव वाघ यांची नियुक्ती
Views: 345
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 32 Second

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभारी समन्वयक पदी वैभव वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्वपूर्ण आहे. शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई यांनी वैभव वाघ यांच्या नियुक्तीचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

वैभव वाघ गेल्या २० वर्षांपासून संघटनात्मक व सामाजिक कार्यात भरीव योगदान देत आहेत. वंदे मातरम संघटनेच्या, तसेच गणेशोत्सव मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक, युवक संघटन क्षेत्रात मोठे काम उभारले आहे. या कामांमुळे युवा वर्गात त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून त्यांचा दांडगा अनुभव आहे. स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा अशा तब्बल १११ पेक्षा अधिक निवडणुकांचे रणनीतीकार म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि निवडणूक व्यवस्थापनेचे कौशल्य शिवसेनेला येत्या काळात फायद्याचे ठरणार आहे. कोरोना काळात वैभव वाघ यांनी गरजूंसाठी देशभर केलेले कार्य, प्लाझ्मा प्रीमियर लीग सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम, कोरोना मृतांच्या अंत्यविधी कामातील सहभाग अशा उल्लेखनीय कामासाठी वैभव वाघ यांना देशभरातून ‘हेल्थगिरी अवॉर्ड’चे तिसरे नामांकन मिळाले होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून वाघ यांनी वंदे मातरम संघटनेला राज्यभर विस्तारले आहे. त्यांच्या राजकीय, सामाजिक आणि रणनीतीच्या कामाच्या अनुभवाचा शिवसेनेला आगामी निवडणुकांत फायदा होणार आहे. वैभव वाघ ह्यांच्या नियुक्तीमुळे शिवसेना उमेदवारांच्या निवडणुकींच्या तयारीवर आणि पर्यायाने निवडणूक निकालांवर चांगला परिणाम होईल अशी चर्चा पुणे पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

शिवसेनेने प्रभारी समन्वयक पदाची जबाबदारी सोपवल्याबद्दल आनंद व्यक्त करत वैभव वाघ म्हणाले, “हे केवळ पद नाही, तर जबाबदारी आहे. ही संधी दिल्याबाबद्दल शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, युवासेना प्रमुख, पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे, खासदार संजयजी राऊत, खासदार अनिलजी देसाई, डॉ. नीलमताई गोऱ्हे, शिवसेना उपनेते रविंद्रजी मिर्लेकर, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आणि शिवसेना उपनेते सचिनजी आहिर, सहसंपर्क प्रमुख आदित्यजी शिरोडकर या सर्वांचे आभार मानतो. त्यांच्या मार्गदर्शनाने आगामी काळात पक्षासाठी भरीव काम करण्याचा विश्वास व्यक्त करतो.”

“पुढील काळात पुणे, पिंपरी-चिंचवडचे सर्व सन्माननीय शहरप्रमुख, पदाधिकारी आणि शिवसेना परिवारातील प्रत्येक शिवसैनिक ह्यांच्या सोबत समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचत विकासाभिमुख आणि दूरगामी काम करण्याचा संकल्प आहे. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण ही शिवसेनेची कार्यपद्धती सार्थ करत आम्ही सगळे चांगले काम उभे करत राहू ह्याची खात्री देतो,” असेही वैभव वाघ यांनी नमूद केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
50%
3 Star
0%
2 Star
25%
1 Star
25%

4 thoughts on “शिवसेनेकडून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभारी समन्वयकपदी वैभव वाघ यांची नियुक्ती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?