सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन
Views: 343
0 0

Share with:


Read Time:4 Minute, 23 Second

अहमदनगर: सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी साडेचार वाजता संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पाणीप्रश्नी नेहमी आग्रही भुमिका मांडणारे अभ्यासू नेते म्हणून शंकरराव कोल्हे यांची ओळख होती.

कोपरगाव येथील संजीवनी सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ शंकरराव कोल्हे यांनी रोवली. सहा दशकात त्यांना महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या मंत्रिपदावर काम करण्याची संधी मिळाली.त्या संधीचे त्यांनी सोनं केलं. शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांच्या जाण्यानं तालुक्यात शोककळा परसली आहे. सहकारातील महान व्यक्तीमत्वाचा अंत झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

 

येत्या 21 मार्चला शंकरराव कोल्हे यांचा वाढदिवस होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्यानं कोल्हे परिवार व संजीवनी उद्योग समुहावर शोककळा पसरली आहे. शंकरराव कोल्हे यांचे ‘सत्याग्रही शेतकरी’ हे आत्मचरित्र आहे.

कोपरगाव तालुक्यातील येसगांव सारख्या छोट्याशा खेडेगावातून ग्रामीण जीवनाचा बाज अंगी बाळगत कोल्हे यांनी धाडसानं सर्वच क्षेत्रात काम केले. कोल्हे यांनी दीर्घकाळ कोपरगावचे प्रतिनिधीत्व केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरवातीच्या काळापासून काम केले. अलीकडे ते राज्याच्या सक्रीय राजकारणापासून अलिप्त झाले होते. मात्र, त्यांची सून माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून गेल्या सरकारच्या काळात कोपरगावचे प्रतिनिधीत्व केल्याने कोल्हे घराण्याचा भाजपशी संबंध आला.

 

कोल्हे यांचे सहकारातील योगदान मोठे आहे. १९६० मध्ये त्यांनी संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्यानंतर अनेक सहकारी संस्था उभ्या केल्या आणि सक्षमपणे चालविल्या. शिक्षण संस्था स्थापन करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च आणि दर्जेदार शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न केला. १९८५ ते १९९० चा अपवाद सोडता ते सहा वेळा ते कोपरगावचे आमदार होते. या काळात महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क या खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. बी. एस्सी. अ‍ॅग्रिकल्चरची पदवी संपादन केलेले कोल्हे यांचे शेती, सहकार, पाणी, साखर, जागतिकीकरण अशा विविध क्षेत्रात मोठा कार्य आहे. येसगावचे सरपंच ते मंत्री आणि इतरही अनेक महत्वाच्या संस्थांचे पदाधिकारी म्हणून त्यांनी मजल मारली. त्यांना विविध पुरस्कार मिळाले. विविध विषयांवरील त्यांची पुस्तकेही आहेत. विविध क्षेत्रातील अभ्यासासाठी त्यांनी परदेश दौरे केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
100%

8 thoughts on “सहकारातील ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?