पुणे: राष्ट्रीय समाज पक्ष संस्थापक अध्यक्ष व मा. मंत्री महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त शारदा अनाथ आश्रम शाळा साई मंदिर प्रती शिर्डी शिरगाव या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शालेय साहित्य तसेच फळ-खाऊवाटप करण्यात आले. यावेळेस राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब सुतार,पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष भरत महानवर,युवक शहराध्यक्ष छत्रपती सांगोलकर विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष उमेश लोहार, महिला आघाडी अध्यक्ष रोहिणी गंगावणे, रासपचे नेते संतोष गावडे, संपत मामा चांदेरे, युवानेते सुनील आखाडे, आरिफ शेख, तसेच शाळेचे मुख्याध्यापक विजय लोखंडे, शिक्षक संतोष चव्हाण सर उपस्थित होते.
त्याचबरोबर ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ वृक्षवल्ली हे आपलेच, कुटुंबीय आहेत असे मानणारे तुकारामासारखे व इतरही संतकवीनी वृक्षाचे महत्त्व पटवून दिले आहे आणि हेच लक्षात घेऊन महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्तनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रा स प तालुका अध्यक्ष अंकुश बोके, आबासाहेब निचळ रासप सोशल मीडिया प्रमुख अतुल कटारनवरे, सरचिटणीस शिवा भाऊ निचळ, शरद ठोंबरे, लक्ष्मण निचळ, विठ्ठल निचळ, प्रवीण निचळ उपस्थित होते. यावेळी प्रत्येकाने 11 वृक्ष लावण्याचा व संवर्धन करण्याचा संकल्प केला.