सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे तसेच सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदाने जगावे – प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील
Views: 536
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 58 Second

पिंपरी चिंचवड, ३१ मार्च :- सेवानिवृत्तीचा आजचा दिवस निवृत्त होणा-या कर्मचा-यांसाठी त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असून सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचा-यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे तसेच सेवानिवृत्तीनंतरचे जीवन आनंदाने जगावे असे प्रतिपादन प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने माहे मार्च २०२२ अखेर सेवानिवृत्त व स्वेच्छानिवृत्त होणा-या कर्मचा-यांचा सत्कार प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होते.

सेवानिवृत्ती कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,
जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंझुर्डे तसेच सेवानिवृत्त कर्मचा-यांचे नातेवाईक उपस्थित होते.

माहे मार्च २०२२ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांमध्ये ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. विजया आंबेडकर, मुख्याध्यापिका लता दिघे, कार्यालयीन अधिक्षक प्रतिभा महाजन, लॅब टेक्नशियन पुरुषोत्तम गायकवाड, लिपिक हरिभाऊ गावडे, उपशिक्षिका साधना यादव, रजनी बेंगळे, सरोज
पाटील, सर्व्हेअर सुनील चौधरी, शिपाई राजू डोळस, मजूर भुजंग मिटकर, सफाई कामगार ठकुबाई शेलार,
सफाई सेवक रामीबाई वाल्मिकी यांचा समावेश आहे.

तर स्वेच्छानिवृत्ती घेणा-या कर्मचा-यांमध्ये मुख्य लिपिक कैलास रानवडे, मुकादम प्रमोद चव्हाण, सफाई कामगार शाम बोरगे, स्प्रे कुली रमेश जगताप, गटरकुली राजू जगताप, जितेश बेंगळे यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?