पुणे: देशातील ख्यातनाम नेत्रोपचार रुग्णालयाची साखळी एएसजी आपल्या विस्तार धोरणांतर्गत पुण्यात दाखल होत आहे. संस्थेची महाराष्ट्रातील चौथी शाखा असून पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर मध्ये साकारण्यात येत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
सदर रूग्णालयात गोतीबिंदू (फेको) लसिक व्हिटीओ रेटोना आक्युलोप्लास्टी ग्लूकोमा कॉर्निया तिरळेपणा न्युरो ऑप्येल्मॉलॉजी आदी नेत्ररांगांच्या श्रेणींवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध राहणार आहेत. पुणेकरांना या सुविधा रविवारी देखील उपलब्ध करून देण्याच्या इरादयाने आम्ही कटिबध्द राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
पुणे मधील प्रकलपामध्ये डोळयाशी निगडीत सर्व आजार जटील शस्त्रकिया निदान व उपचार एकाच छताखाली उपलब्ध राहणार आहेत. एएसजी डोळयाचे रुग्णालय वेळोवेळी शिबिराचे आयोजन करून गरीब व गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळवून देतील.