कुस्ती, संगीत, चित्रपट, लोककला यासारख्या क्षेत्रांतील खेळाडु आणि कलावंतांना राजाश्रय देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे ख-या अर्थाने रयतेचे लोककल्याणकारी राजे होते – पिंपरी चिंचवड मनपा अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप
Views: 230
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 46 Second

पिंपरी चिंचवड दि.२६ जून २०२२-  समाजातील सर्व घटकांना समानतेचा दर्जा मिळवून देण्यासाठी व स्त्रीशिक्षणाचा प्रसार करण्याकरिता कृतीशील प्रयत्न करणारे आरक्षणाचे जनक तसेच कुस्ती, संगीत,चित्रपट, लोककला यासारख्या क्षेत्रांतील खेळाडु आणि कलावंतांना राजाश्रय देणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे ख-या अर्थाने रयतेचे लोककल्याणकारी राजे होते, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पिंपरी येथील महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस तसेच के.एस.बी. चौक,चिंचवड येथील पूर्णाकृती पुतळ्यास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या दोन्ही कार्यक्रमास माजी महापौर मंगला कदम, जनसंपर्क अधिकारी किरण गायकवाड, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी पांडुरंग पाटील,मिलींद वेल्हाळ,जगदीश परिट, सुनील पाटील,महिला अध्यक्षा अर्चना तौंदकर आदी उपस्थित होते.
के.एस.बी.चौक येथील कार्यक्रमास माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, वंचित बहूजन आघाडीचे देवेंद्र तायडे,संतोष जोगदंड, भारतीय बौध्द महासभेचे बापूसाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू पवार, धनाजी येळकर, पी.बी.पाटील आदी उपस्थित होते. यावेळी विविध संघटनांकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना मानवंदना देण्यात आली.
दरम्यान, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन संभाजीनगर येथील साई उद्यान येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी माजी महापौर मंगला कदम,कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे पदाधिकारी पांडुरंग पाटील,जगदीश परिट,सुनील पाटील,महिला अध्यक्षा अर्चना तौंदकर, मिलिंद वेल्हाळ, प्रकाश ढवळे उपस्थित होते. यानंतर एस.के.प्राॅडक्शनच्या वतीने “जागर लोकपरंपरेचा”या कार्यक्रमातून लोककला, शेतकरी गीते सादर करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?