राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात  विरोधकांवर टीकास्त्र तर सोडलेच पण पदाधिकाऱ्यांचे टोचले कान
Views: 70
0 0

Share with:


Read Time:2 Minute, 12 Second

मुंबई : आगामी काळातील निवडणुका आणि पक्ष संघटनेच्या अनुशंगाने (MNS Party) मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी (Raj Thackeray) राज ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र तर सोडलेच पण पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. पक्षाने केलेली कामे जनतेमध्ये घेऊन जाणे महत्वाचे आहे. शिवाय त्याच बरोबर अॅडजस्टमेंटचे (Politics) राजकारण करु नका, त्याने किंमत राहत नाही, शिवाय राजकीय कारकिर्दसाठी घातक आहे. यामुळे किंमत तर कमी होतेच समाजामध्ये वावरणेही मुश्किल होते. अशा गोष्टी लपून राहत नाहीत. त्यामुळे केलेली कामे आणि समाजकारण जनते समोर घेऊन जा आणि ताट मानेने मत मागा, असा सल्ला राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे भविष्यात पक्ष कुठे कमी पडणार नाही. आणि तुम्हीही कुठे कमी पडू नका असेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

 

निवडणुका वगळता इतर वेळी देखील पक्षाने समाजहिताचे काम केलेले आहे. मराठी माणसासाठी लढा उभा केलेला आहे. शिवाय त्याचा रिझल्टही मिळाला आहे. त्यामुळे निवडणुकांच्या दरम्यान केलेले काम जनतेसमोर घेऊन जाणे गरजेचे आहे. अॅडजेस्टमेंट करून निवडणुका लढवू नका. त्यामुळे पक्षाचे आणि स्वत:चे राजकीय करिअरही धोक्यात येते. सध्या निर्माण झालेल्या राजकीय स्थितीचा फायदा घ्या. आगामी काळात येणारी प्रत्येक निवडणुक ही ताकदीने लढा, पक्षही तुम्हाला काही कमी पडू देणार नाही असे आश्वासन राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?