जांभळे बटाटे हे पांढऱ्या बटाट्यापेक्षा जास्त फायदेशीर असतात, जाणून घेऊयात
Views: 157
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 8 Second

पुणे: जांभळ्या बटाट्याची कातडी जांभळ्या रंगाची असते आणि त्याची थोडी वेगळी चव असते. दक्षिण अमेरिकेतील एका भागात आढळणारा जांभळा बटाटा भारताच्या बाजारपेठेत कमी प्रमाणात आढळतो. पण जांभळे बटाटे सुपर मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात. जांभळ्या बटाट्याचा पोत सामान्य बटाट्यासारखाच असतो, पण पौष्टिकतेचा विचार केला तर ते पांढऱ्या बटाट्यापेक्षा जास्त फायदेशीर असतात. जांभळ्या बटाट्यातील पौष्टिकतेबद्दल बोलायचे झाले तर त्यात स्टार्चचे प्रमाण कमी असते. ते खाण्याचे काय फायदे आहेत आणि ते कसे शिजवले जातात, याविषयी (Benefits of purple potato) जाणून घेऊया.

जांभळे बटाटे खाण्याचे फायदे –

कर्करोगाचा धोका –

स्टाइलक्रेसच्या मते, जांभळ्या बटाट्यामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. यामुळे पेशींमध्ये ट्यूमर तयार होण्याचा धोका देखील कमी होऊ शकतो. या बटाट्याचे सेवन केल्याने आतडे, कोलन इत्यादींमध्ये ट्यूमर बनण्याची शक्यता 50 टक्के कमी होऊ शकते, असे संशोधनातून समोर आले आहे.

रक्तदाब नियंत्रणात –

जांभळा बटाटा उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. जांभळ्या बटाट्याच्या सेवनाने सिस्टोलिक रक्तदाब 3 टक्के आणि डायस्टोलिक रक्तदाब सुमारे 4 टक्के कमी होऊ शकतो.

पचन व्यवस्थित होतं –

जांभळ्या बटाट्यामध्ये पॉलिफेनॉल असतात. जे पोट निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
यकृतासाठी उपयोगी-
जांभळ्या बटाट्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे यकृत निरोगी राहते. हा बटाटा खाल्ल्याने अँटिऑक्सिडंट क्रिया वाढते, ज्यामुळे यकृतावरील चरबी कमी होते.

जांभळा बटाटा कसा खावा –
ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला जांभळे बटाटे, लसूण, मीठ, मिरपूड, ओवा लागेल. या सर्व गोष्टी एका भांड्यात घेऊन फोडणीच्या गोष्टींनी फोडणी द्या, नंतर त्यात हा बटाटा घाला. वेळोवेळी परतत राहा, पाणी, तिकट आपल्या चवीनुसार घाला आणि ते मऊ होईपर्यंत गॅसवर शिजवा. नंतर उशीर न करता गरमागरम सर्व्ह करा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

One thought on “जांभळे बटाटे हे पांढऱ्या बटाट्यापेक्षा जास्त फायदेशीर असतात, जाणून घेऊयात

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?