अशोकभाऊ तांबे, राष्ट्रीय समाज पक्ष
पाथर्डी: राज्य भरातील धनगर समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की, पक्ष कुठलाही असू द्या.किंवा सत्ता कुठल्याही पक्षाची असो बहुजन समाजातील महापुरुषांच्या नावावर फक्त राजकारण करण्याची…मी तर म्हणेल स्वार्थाचे राजकारण करण्याचे उद्योगधंदे आपल्या राज्यातील पांढर पेशींनी सातत्याने केले आहे. बहुजन समाजातील महापुरुषां बद्दल कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा राज्यकर्त्याला महापुरुषां बद्दल सोयर सुतक नाही.मात्र राजकीय पोळी भाजण्याची योग्य वेळ आली की, हेच पांढर पेशी आमच्या बहुजन समाजातील महापुरुषांचा ईतिहास सांगण्याची संधी सोडत नाहीत.
बांधवांनो आज पर्यंत आपण प्रामुख्याने बघितले आहे की, जात, पात, धर्माच्या नावावर याच सत्तेच्या नालायक पुजाऱ्यांनी आपला राजकीय उल्लू सरका कसा होईल.बस या कडे लक्ष केंद्रित केले असून तुमच्या आमच्यात भांडणे लावण्याची एकही संधी सोडली नाही. आम्ही सुध्दा या नालायकांच्या नादी लागून आमच्या महापुरुषांना टार्गेट करण्याचे काम केले.आम्हाला आमच्या महापुरुषांचा ईतिहास माहीत नसल्या मुळे त्यांच्या जयंती,पुण्यतिथी साजऱ्या करण्या बाबत आम्ही सुध्दा सकारात्मक दृष्टया कधी विचारच केला नाही आणि म्हणून राज्यकर्ते, सत्ताधाऱ्यांनी आमच्या महापुरुषांचा ईतिहास दाबण्याचा अविरत प्रयत्न केला आणि आजही आमच्या महापुरुषांचा ईतिहास समाजा पर्यंत येऊ न देण्याचे काम राज्यकर्ते सातत्याने करीत आहेत.
बांधवांनो आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास जर बघितला तर १७२५ ते १७९५ या ७० वर्षाच्या कालावधीत आमच्या या माय माऊलीने(अहिल्यादेवी)तब्बल २८ वर्ष होळकर साम्राज्याची यशस्वी धुरा सांभाळली.तेही एक महिला असून सुध्दा त्यांनी प्रजेच्या कल्याणा साठी जे जे करता येईल ते ते करण्या साठी प्राधान्याने लक्ष दिले.मग त्या मध्ये त्यांनी रस्ते, राजमार्ग, पुल, दळणवळण, शिक्षण, पर्यटन, पाणी प्रश्न, वृक्षारोपण व संवर्धन साठी विशेष लक्ष दिले. मंदिर,मस्जिद चा जीर्णोद्धार केला. आजही जे चार धाम,बारा ज्योतिर्लिंग देशात दिमाखात उभे आहेत ते फक्त अहिल्यादेवी होळकरांची देण आहे. त्याही पलीकडे जाऊन आमच्या माऊलीने आज जे देशात तंटामुक्ती अभियान, सावकार विरोधी कायदा, हुंडा विरोधी कायदा, टपाल सेवा अविरत पणे चालू आहे.हे सुध्दा अहिल्यादेवी होळकर यांच्या कल्पनेतून अविरत चालू आहे. त्यांच्या राज्यात जो भ्रष्टाचार,चोर, दरोडेखोरांचा उत्पात वाढला होता त्याला देखील चाप लावण्याचे काम अहिल्यादेवी होळकरांनी केले. असे कित्येक जनहिताची कामे सांगता येतील की, पुरुषांना सुध्दा ते करणे साध्य नव्हते. असे एक नाही अनेक कामे त्यांनी स्वकर्तृत्व आणि मनगटाच्या जोरावर सिध्द करून दाखविले आणि मग अशा प्रजादक्ष आदर्श राज्यकारभार करणाऱ्या जगातील एकमेव राज्यकर्ती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा ईतिहास जर समाजा पर्यंत पोहोचवायचा असेल तर प्रत्येक गावात,गल्ली बोळात,वाड्या वस्तीवर येत्या ३१ मे ला जयंतीच्या निमित्ताने त्यांचा ईतिहास घरा घरात पोहोचविण्याचे काम प्रत्येक समाज बांधवांनी केले पाहिजे.
बांधवांनो राज्यकर्त्यांनी जरी आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा ईतिहास गाढण्याचे काम केले असेल तरी पण प्रत्येक समाज बांधवाने जागृत राहून आमच्या अहिल्यादेवीचा ईतिहास सर्व सामान्य माणसा पर्यंत आणण्याचे कार्य प्रत्येकाने केले पाहिजे. बस हेच मला या लेख मधून अधोरेखित करायचे आहे.