पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान रूपीनगर, तळवडे आयोजित राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्म उत्सव निमित्ताने शोभा यात्रेचे आयोजन
Views: 1495
0 0

Share with:


Read Time:7 Minute, 40 Second
पिंपरी चिंचवड: पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान रूपीनगर राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मउत्सव, शोभा यात्रा आयोजित केली होती. ही शोभा यात्रा एकता चौक पासून कार्यक्रम स्थळ रूपीनगर तळवडे येथपर्यंत काढण्यात आली होती. या शोभायात्रेत उंट-घोडे, गज नृत्य, डीजे सिस्टीम, ढोल पथक, हलगी वादन यांचा विशेष समावेश होता.
या कार्यक्रमात माजी मंत्री प्रा.राम शिंदे, बाळासाहेब दोलतडे, एकता हिंदू चे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, ऑल इंडिया धनगर समाज चे अध्यक्ष प्रवीण काकडे यांच्या शुभहस्ते भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेशदादा लांडगे (स्व बी. के. कोकरे सन्मान 2022 हा विशेष सन्मान पत्र देऊन सत्कार केला तर डॉ. राम तांबे (वैद्यकीय क्षेत्र)  अॅड.  राजेश पुणेकर (कायदेतज्ञ क्षेत्र) शांताराम दगडू भालेकर (सामाजिक क्षेत्र) सुबोध गलांडे (शैक्षणिक क्षेत्र) सागर चव्हाण (गौरक्षण क्षेत्र)
निसर्गराजा मित्र जीवांचे (पर्यावरण क्षेत्र) यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रा. राम शिंदे यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्य-कर्तृत्व असामान्य असे समाजकार्य राहिलेले आहे. यापुढील काळात देखील प्रतिष्ठानच्या वतीने अशीच कामे केली पाहिजेत जे लोकांच्या उपयोगी आले पाहिजेत. अडचणीत, दुःखात त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली पाहिजे. अहिल्यादेवींच्या विचारांचे अनुकरण करत आपण या प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेच काम वाढवली पाहिजे. मला अनेक जणांनी प्रश्न सांगितले की. इथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु केवळ जागा उपलब्ध करून देऊन चालणार नाही. आमची माणसे माथाडी कामगार आहेत. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून पोट भरायला आलेली माणसे येथे स्थायिक झाले आहेत. काही काम करायला आले असतील ते कुठे एक-दोन कोटी खर्च करणार आहेत! आपली पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आशिया खंडात सर्वात मोठी आहे, असेच सांगतात. आपल्याला वर्गणी करायची वेळ येऊ नये म्हणून आमदार महेश दादा याची काळजी घ्या.
पुढे मिलिंद एकबोटे हे म्हणाले की, अहिल्यादेवींनी आपल्या दौलतीची काळजी तर घेतलीच त्याचबरोबर हिंदू धर्माची देखील काळजी घेतली आणि अखिल भारतीय दृष्टिकोन काय असतो हे त्यांनी त्यांच्या जीवनातून दाखवून दिले. त्यांनी संपूर्ण हिंदुस्थानात अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले, नद्यांवर घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या आणि संपूर्ण हिंदुस्तान संस्कृतीला उजाळा दिला. शरद पवार यांच्या वर टीका करत म्हणाले, त्यादिवशी एका विद्वान गृहस्थ चौंडीला म्हणाले की, अहिल्यादेवींनी रस्ते, पाणी यासारख्या सुविधा निर्माण करत रोजगार वाढवण्याचे काम केले आणि माझा नातू आता तेच काम करतोय. अहो सद्गृहस्थहो, तुम्हाला अहिल्यादेवी ह्या काय कळल्या? अहिल्यादेवी म्हणजे हिंदू धर्म आणि अहिल्यादेवी म्हणजे हिंदू राष्ट्र. तुमच्या शुद्रतेची आम्हाला कीव येते.
प्रवीण काकडे म्हणाले की, अहिल्यादेवी यांच्या विचारांचा जागर या प्रतिष्ठानने केला त्याबद्दल प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो. वास्तविक अहिल्यादेवींचा आचार आणि विचार जोपासण्याचा असेल तर खऱ्या अर्थाने बुद्धिजीवी वर्गाला जमिनीवर राहून काम करणे क्रमप्राप्त ठरते. आजही अहिल्यादेवींचा इतिहास तळा-गाळामध्ये रुजलेला नाही. तो इतिहास पुन्हा आपल्याला वाचायचा असेल तर धनगर समाजाचा गौरवशाली इतिहास हे पुस्तक प्रत्येक घरा-घरामध्ये असणे गरजेचे आहे.
बाळासाहेब दोलताडे ते म्हणाले की, खेड्यापाड्यातून आमचा हा बांधव इथे काम करत असताना तुमची काम करत असतो. निवडणूक आली की तुमची झेंडे घेऊन पळतो पण निवडणुकीत धनगर बांधव पक्षाला तिकीट मागायला लागला तर त्याचा द्वेष करतात.  तिकीट देण्याचे टाळले जाते. आमदार महेश दादांना माझी विनंती आहे कि, येणाऱ्या महानगरपालिकेत किमान दहा नगरसेवकांसाठी तिकिटे द्यावीत.
आमदार महेश दादा लांडगे हे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्ताने या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज मला स्वर्गीय बी. के. कोकरे विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ज्या पद्धतीने बी.के. कोकरे यांचे धनगर समाजासाठी काम होते त्याच पद्धतीचे काम विधानसभेत गाजवण्यासाठी 100% पुढे राहील, याची ग्वाही मी देतो. मला सन्मानित केल्याबद्दल या प्रतिष्ठानचे आभार मानतो.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन वाघमोडे सूत्रसंचालन अजित चौगुले तर आभार प्रदर्शन शिवाजी बिटके यांनी केले.
यावेळी पुण्यश्लोक आहिल्यादेवी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दत्ता करे, सुनील बनसोडे, सचिव राजेंद्र सोनटक्के,संघटक नाना गावडे, खजिनदार संजीव रुपनवर, आधारस्तंभ सचिन नायकवडे त्याचबरोबर दयानंद सोनटक्के, संजय भोगे, वैजनाथ सुरवसे, उमाजी सोनटक्के, अमोल शेडगे, संतोष देवकाते, अक्षय सरवदे, जनार्दन शिंदे, नितीन वाघमोडे, दीपक काळे, विनोद नवले, संजय वागमोडे, अक्षय मरगळे, सौरभ देवकाते, तुषार देवकाते व धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

222 thoughts on “पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठान रूपीनगर, तळवडे आयोजित राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्म उत्सव निमित्ताने शोभा यात्रेचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Is there any news?