पुणे: यिता फाउंडेशन” तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिवस वानवडी येथे उत्साहात साजरा
Views: 523
3 0

Share with:


Read Time:2 Minute, 13 Second

पुणे- “यिता फाउंडेशन ” तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन पुण्यातील वानवडी येथील डॉक रेस्टॉरंट येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून पुण्याच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील उपस्थित होत्या. याप्रसंगी भावना गौड,मनोलीना बोरकर, काव्या लडकत,पोलीस उपनिरीक्षक भारती इंगळे, डॉ. गायत्री तेवारी,सायबर क्राईमच्या पोलीस उपनिरीक्षक चित्रा चौधरी ,नीशरीन पूनावाला, रिद्धिमा विर्दी, आरती जमदाडे ,वर्षा भालेराव, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ यांची विशेष सन्माननीय उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात अंजली खराडे यांच्या कथक नृत्याने झाली. यावेळी पल्स स्टुडिओ यांच्या तर्फे महिला संरक्षणा वर कराटेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच यावेळी जीएनडी क्रू तर्फे लहान मुलांनी पोलिस वेशात अतिशय सुंदर सिंघम डान्स सादर केला. या कार्यक्रमाचे आयोजन यिता फाऊंडेशन चे तुषार मोहंता,राहेल शेकटकर,रेला केन,शशांक शर्मा,सुनील विधाते,मनीष कुमार,राजू भाईक,अनघा मेहता, दिपाली पाटील,प्रियांका शहा, शिवानी खेरेलीया यांनी केले होते. यावेळी विविध मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन आयोजकांतर्फे सत्कार करण्यात आला.तसेच आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला अतिथींनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन रित्झु यांनी केले.

Happy
Happy
100 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

Open chat
1
Is there any news?