पुणे: सेवा पंधरवडा’ निमित्त तृतीयपंथी नोंदणी ओळखपत्र वितरण कार्यक्रम
Views: 215
0 0

Share with:


Read Time:3 Minute, 4 Second

पुणे:  ‘ सेवा पंधरवडा’ निमित्त तृतीयपंथी नोंदणी -ओळखपत्र वितरण, आधारकार्ड -मतदानकार्ड नोंदणी कार्यक्रम सामाजिक न्याय भवन विश्रांतवाडी येथे संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्रीमती संगीता डावखर(सहा. आयुक्त समाजकल्याण, पुणे)यांनी केले.
मा.श्री.पाटोळे सर (उपजिल्हाधिकारी) यांनी ,तृतीयपंथीना रेशनकार्ड आधारकार्ड प्रक्रीयेबाबत मार्गदर्शन केले व तृतीयपंथीना आधार कार्ड व रेशनकार्ड काढून घेण्याबाबत आवाहन केले.
श्रीमती रंजना गगे ( उपायुक्त समाज विकास विभाग ,पुणे मनपा) यांनी पुणे मनपा मार्फत तृतीयपंथीसाठी असणार्या योजनांची माहिती दिली व लाभ घेण्याचे आवाहन केले.
मा. श्री. कडलग ( उपायुक्त, मतदार नोंदणी अधिकारी) यांनी मतदानकार्ड बाबत माहिती दिली.
मा.सोनाली दळवी( मिस फांऊडेशन) यांनी तृतीयपंथीचे प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व मागण्या मांडल्या.
मा.श्री.प्रवीण बनकर( संचालक रूडसेटी) यांनी तृतीयपंथीसाठी रोजगाराभिमुख विविध प्रशिक्षणांबाबत माहिती दिली.
मा. श्री. रवींद्र कदम पाटील ( उपायुक्त नाहसं समाजकल्याण आयुक्तालय पुणे), यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये तृतीयपंथी यांना मुख्यप्रवाहात सामावून घेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे व यासाठी असे कार्यक्रम यापुढेही आयोजित करण्यात येतील,याद्वारे स्वत:चा विकास साधावा असे मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राजेंद्र शेलार ( तालुका समन्वयक) यांनी केले तर आभारप्रदर्शन मा. श्री. मुळे(सहा. संचालक वित्त व लेखा विभाग, प्रादेशिक उपायुक्त कार्यालय,पुणे) यांचा मार्फत करण्यात आले.
श्रीमती नेत्राली येवले (स. क. नि.पुणे) , शितल बंडगर( प्रकल्प अधिकारी पुणे जिल्हा) तसेच श्री. मंगेश गाडीवान ( तालुका समन्वयक), श्री. राजेंद्र शेलार( तालुका समन्वयक) यांनी सदर कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करणेसाठी ,सावली, हेल्पेज, फेसकाॅम, सिफार या सेवाभावी संस्थेचे सहकार्य लाभले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share with:


रिपोर्टर टुडे न्यूज

Open chat
1
Is there any news?